आमदार राम सातपुते (Ram Satpute) आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)हे दोघेही आक्रमक नेते सोलापूर लोकसभेच्या (Solapur Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरले आहेत, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करीत आहेत. सोलापुरची यंदाची लोकसभा चांगलीच रंगतदार होणार आहे. त्याची सुरुवात आज झाली.
विधानसभेत प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांची भाषणांची नेहमी चर्चा होत असते. आता हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे त्यांच्यातील 'सामना'अधिकच रंगतदार होण्याचे चित्र आहे. सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण सलग दोन निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातपुतेंना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी तत्काळ सोशल मीडियावरून पत्र लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या.या शुभेच्छा देतांना प्रणितीताईंनी स्थानिक विरुद्ध उपरा हा मुद्दा अलगतपणे चर्चेत आणला आहे. सोलापूरची लेक म्हणून त्यांनी सातपुतेचं स्वागत केले, पण स्वागत करताना सातपुतेंना टोमणे मारण्याचा त्या विसरल्या नाहीत.
प्रणिती शिंदे यांच्या या पत्राला माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील राम सातपुते हे मागच्या पाच वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या स्वच्छ कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींकडून त्यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी भाजपने दिली आहे.
काँग्रेस पराभवाच्या भीतीने 'स्थानिक आणि उपरा' असा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापूरकर हे अशांना भीक घालणार नाहीत. मोदीजींच्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामावर विश्वास ठेऊन भाजपला विजयी करतील, त्यावेळी प्रणितीताईं या इतक्याच मोठ्या मानाने माझं अभिनंदन करतील असं म्हणत टोला लगावाला आहे.
राम सातपुते यांच्या सडेतोड उत्तरानंतर काँग्रेस कार्यकर्ते सोशल मीडियावरील अॅक्टिव्ह झाले आहेत. "चला लागा कामाला, बीडचे पार्सल, बीडला परत पाठवा" अशा आशयच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. त्याला भाजपचा सोशल मीडिया आता कसे उत्तर देणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.