MLA Samadhan Avtade
MLA Samadhan Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार समाधान आवताडेंनी दिले विरोधकांना आव्हान : म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

सोलापूर - श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत श्री संत दामाजी शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा नारळ माचनूर येथील सिध्देश्वर मंदिरात फोडण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे ( Samadhan Avtade ) यांनी विरोधकांना आव्हान दिले. Shri Sant Damaji Cooperative Sugar Factory Election

आमदार समाधान आवताडे म्हणाले, दामाजी कारखाना हा लुटायची खाण आहे, असा समज आजपर्यंत विरोधकांचा होता परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा आहे. कोणत्याही बँकेचा मी थकबाकीदार आहे हे दाखवून द्या मी सगळं राजकारण सोडून देतो, असे आव्हानच आमदार समाधान आवताडे यांच्या समोर उभे केले.

ते पुढे म्हणाले की, संत दामाजी साखर कारखाना 2016 च्या निवडणुकीत मत रुपी आशीर्वाद देऊन मागील सहा वर्षांमध्ये या माध्यमातून सभासद व शेतकर्याची सेवा करण्याचे भाग्य मिळाले व सर्व सभासद, शेतकऱ्याकडून चालू काळामध्ये समस्या जाणून कारखान्याचा गळीत हंगाम व्यवस्थितरीत्या चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत तसा मानस संचालक मंडळाने केला. अडचणीच्या काळात सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी सहा वर्षात कारखाना बंद न ठेवता तालुक्यातील सहकारातील राजवाडा चालू ठेवण्याचा अतोनात प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

हा कारखाना सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी गुणवत्ता व आर्थिक वाढ कशा पद्धतीने चालवण्याचा निर्णय आम्ही सर्व संचालक मंडळाने घेतला. संचालक मंडळाने विश्वासाच्या जोरावर कारखाना चालू ठेवून पुढील काळामध्ये जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच कारखान्याच्या कामगारांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळाल्यामुळे कारखान्यात व्यवस्थित पणे गाळप करण्यात आले.आमचे सर्व शेतकरी सभासद सुज्ञ आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत, विरोधी गटात प्रामाणिक पणा नाही.वाईट विचारांना वाईट लोकांना कारखान्यापासून दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी केले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, बापूराया चौगुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोमनाथ आवताडे, राजन पाटील, अॅड. बापूसाहेब मेटकरी, सुरेश भाकरे, गणेश गावकरे, राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, सचिन शिवशरण, विजयसिंह पाटील, युवराज शिंदे, विलास डोके, लाडिक डोके, गोपाळ पवार, आबासाहेब डोके, सुधाकर मासाळ, आण्णासाहेब पाटील, चंद्रकांत पडवळे, उद्योजक जनार्दन शिवशरण, युवराज कोळी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT