Samadhan Avtade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावणाऱ्या आवताडेंचे जंगी स्वागत

आमदार आवताडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताच ७ दिवसांत मुख्यमंत्र्यांची, तर त्यापुढील सात दिवसांत कॅबिनेटची मंजुरी घेण्याचा शब्द दिला.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी पावसाळी अधिवेशनात मंगळवेढा (Mangalveda) उपसा सिंचन योजनेसाठी हिरवा कंदील मिळविला. मतदारसंघात परतल्यानंतर आज (ता. २७ ऑगस्ट) त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच, २४ गावच्या वतीने आमदारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, आवताडे यांनी राजकीय शक्ती प्रदर्शन करत आपले आव्हान संपले नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. (MLA Samadhan Avtade received a warm welcome in Mangalveda)

गेले कित्येक वर्षे राजकीय आश्वासनांमध्ये तरंगत असलेल्या मंगळवेढा सिंचन योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनात हिरवा कंदील दाखविला. त्याबाबतचा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी अत्यंत पोटतिडकीने पावसाळी अधिवेशन मांडला होता. अधिवेनात मंगळवेढ्यासाठी महत्वाची असलेली योजना करून मतदार संघात येताच त्यांची फुलाची उधळण करून स्वागत करण्यात आले.

मुंबईतील पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ३१ पेक्षा अधिक तालुका व जिल्ह्यातील प्रश्नांची लक्षवेधी उपस्थित केली. त्यामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या लक्षवेधीला त्यांना बोलण्याची संधी मिळाली. विधानसभेत बोलताना त्यांनी आमचा जन्म दुष्काळात झाला तरी आम्हाला दुष्काळात मरू देऊ नका, असे भावनिक आवाहन केले होते. मुख्यमंत्र्याच्या सहीच्या प्रतीक्षेत असलेल्या मंगळवेढा सिंचन योजनेला हिरवा कंदील द्यावा, अशी मागणी आवताडे यांनी केली होती.

आमदार आवताडे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताच ७ दिवसांत मुख्यमंत्र्यांची, तर त्यापुढील सात दिवसांत कॅबिनेटची मंजुरी घेण्याचा शब्द दिला. तसेच, योजनेसाठी अधिकच्या निधीची आवश्यकता भासल्यास तोही देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे दुष्काळी गावांतील जनतेमधून उत्साह पसरला. आमदार आवताडे समर्थकांनी फटाके वाजवून स्वागत केले.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन संपवून आमदार समाधान आवताडे हे आज मतदारसंघात परतले. मंगळवेढा व पंढरपूरच्या सीमेवर असलेल्या सिद्धेवाडी येथील माण नदीवर त्यांचे फुलाचे उधळण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंगळवेढ्यातील समर्थकांनी भाजपचा झेंडा लावून दुचाकी रॅली काढली. दामाजीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चोखामेळा चौकात त्यांनी जाहीर सभा घेतली. यादरम्यान दुष्काळी २४ गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चोखामेळा चौकात रमेश टाकणे मित्र परिवारांनी पुणेरी पगडी आणि पेढ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT