<div class="paragraphs"><p>Sanjay Shinde</p></div>

Sanjay Shinde

 

Sarkarnama 

पश्चिम महाराष्ट्र

`आमदार संजय शिंदे अपक्षच; ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत`

​अण्णा काळे

करमाळा : करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत. ते स्वतःचे अस्तीत्व ठेऊनच राहतात आणि वागतात. विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना पाठींबा दिला. आता असे काय होईल, असे वाटत नाही, अशी माहिती सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (NCP Solapur president) दिली  आहे. ते करमाळा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.

नुकतेच आमदार संजय शिंदे यांनी आपण अपक्ष आमदार असल्याचे सांगितले होते. यावर थेट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मोठे विधान केले आहे.यावेळी करमाळा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे मंगळवारी (ता. 13) रोजी कै.नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव चिंतामणी जगताप यांच्या निवसस्थानी भेट दिली त्या नंतर त्यांनी पञकारांशी संवाद साधला

यावेळी पुढे बोलताना बळीराम साठे म्हणाले, येणा-या करमाळा नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढला पाहीजे. यासाठी पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर विचारविनीमय करणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक पातळीवर परिणाम होत आहे.

नामदेवराव जगताप व आमचे जुने संबंध आहेत. त्यांच्या मागच्या पिढीची भेट घेण्यासाठी आलो आहे. राजकीय चर्चा वगैरे तसे काही नाही. स्थानिक स्वराज संस्थात स्वतंत्र लढण्याचा विचार आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्व ठिकवणे महत्त्वाचे आहे.   विधानसभेत आमदार शिंदे यांना पाठिंबा देणे पक्षीय पातळीवरील निर्णय होता. मात्र आता तशी परस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. आमदार शिंदे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT