विसापूर (ता. खटाव) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, याउलट शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, ''रणसिंगवाडीने प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाठराखण करून मताधिक्क्य दिले आहे. रणसिंगवाडी-बुध मुख्य रस्ता डांबरीकरण ४२ लाख, साकव पूल ३० लाख, अंतर्गत रस्त्यासाठी दहा लाख यांसह विविध विकासकामांना लाखोंचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे.
रणसिंगवाडी व वेटणे गावातून जिहे-कटापूर योजनेच्या अंतर्गत आंधळी बोगदा गेलेला आहे. या दोन्ही गावांना या योजनेचे पाणी देण्यासंबंधी सर्व्हे करण्याकरता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी १६ लाख मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना जिहे-कटापूरचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.''
आमदार शिंदे म्हणाले, ''यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, याउलट शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.''
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे, ज्येष्ठ नेते जोतीनाना सावंत, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, तुकाराम यादव, युवराज बिटले, ज्ञानेश्वर जगताप, सरपंच सुखदेव रणसिंग, उपसरपंच विठ्ठल मसुगडे, श्रीरंग फडतरे, विठ्ठल फडतरे, बाजीराव जाधव, विश्वास शिंदे, सुनील फडतरे, लक्ष्मण जाधव, सुरेश मसुगडे, नाना मसुगडे, सुनील पोतेकर, सुनील रणसिंग व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.