mns Chief Raj Thackeray on Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray: जातीच्या मुद्द्याला शरद पवार यांनी हातभार लावू नये; राज ठाकरे यांचे आवाहन

Raj Thackeray on Sharad Pawar over Manipur violence Maharashtra:महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता, त्यांना महाराष्ट्राचे मणिपूर झालेले पाहायचे की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Mangesh Mahale

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सगळ्यांनीच तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आरक्षणाच्या मुद्यांवरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलक, विरोधकांवर तोफ डागली.

"आरक्षण आणि राजकारण हे दोन्ही वेगळी गोष्टी आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुणाच्या खाद्यांवर बंदूक ठेवून मतांचे राजकारण केले जाते आहे, हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये, याची काळजी शरद पवार (Sharad Pawar)यांनी घेतली पाहिजे. जातीच्या मुद्द्याला शरद पवार यांनी हातभार लावू नये; राज ठाकरे यांचे आवाहन शरद पवार यांनी हातभार लावू नये," असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे विधान शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी केले होते. त्यावर राज ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांना पवारांना टोला लगावला. "पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता, त्यांना महाराष्ट्राचे मणिपूर झालेले पाहायचे की नाही, महाराष्ट्राचा मणिपूर झालेला त्यांना हवयं की नको," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली ते राज्य जातीपातीत पडले आहे. महाराष्ट्राचा विकास पाहता आरक्षणाची गरज नाही, असे मोठे विधान राज ठाकरे यांनी केले. बाहेरच्या राज्यातील मुले आपल्याकडे येतात, शिक्षण घेतात. त्यांना नोकरी मिळते. आपल्या मुलांनी नोकरी मिळत नाही, राज्यातील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असे ठामपणे राज ठाकरे यांनी सांगितले. जातीच्या मुद्दांवर माथी भडकविण्याचा प्रयत्न सध्या राज्यात केले जात आहे. एकेकी उल्लेख करतात, ते दाखवणे बंद करा, सोशल मिडीयाने हे दाखवणे चुकीचे आहे.

वरळी लढणार

वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. 'कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. आम्हाला ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. आम्ही 2009 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यावेळी आम्हाला त्या मतदारसंघातून 36 ते 38 हजार मतं मिळालेली आहेत. या वेळी आम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत,' असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT