Shalan Shinde Sarkaranam
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Corporation Result : मनसे नेत्याचा खून; भाजप उमेदवाराचा जेलमधून विजय

Shalan Shinde Win Corporation Election 2026 : मनसे नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात अटकेत असतानाही भाजपच्या शालन शंकर शिंदे या प्रभाग क्रमांक दोनमधून तुरुंगातून विजयी झाल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 January : महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे या तुरुंगातून विजयी झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे सरवदे यांचा खून झाला होता.

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधून शालन शंकर शिंदे आणि रेखा दादासाहेब सरवदे ह्या भारतीय जनता पक्षाकडून तिकिटासाठी इच्छुक होत्या. मात्र, भाजपने शालन शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने सरवदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. समाजातील सर्व वरिष्ठांनी एकत्रित येत भांडण नको म्हणून सरवदे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती.

समाजात भांडण नको म्हणून सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिंदे यांच्या समर्थकांनी सरवदे यांच्या घरासमोर गोंधळ घालत आक्षेपार्ह पोस्ट ठेवली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे हे शिंदे यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

बाळासाहेब सरवदे खून प्रकरणी भाजप उमेदवार शालन शिंदे, त्यांचा पती शंकर शिंदे यांच्यासह 15 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी शालन शिंदे, शंकर शिंदे यांना अटक करण्यात आली होती. शालन शिंदे यांनी जेलमधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. जेलमधून त्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT