raj thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा दिलासा; सोळा वर्षांपूर्वीच्या'त्या' खटल्यातून नाव वगळलं

Mangesh Mahale

Sangli News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीच्या शिराळा (Shirala Court) येथील खटल्यातून त्यांना दोष मुक्त करण्यात आले आहे. इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यांचे नाव या खटल्यातून वगळ्यात आले आहे.

2008 मध्ये शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलना दरम्यान हिंसक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याच्या निमित्ताने सुनावणीसाठी राज ठाकरे शिराळ्यामध्ये हजर झाले होते.

त्यानंतर सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावला होता, राज ठाकरे यांचं नाव काढून टाकण्यात यावं,असा अर्ज इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये राज ठाकरेंकडून करण्यात आला होता.

इस्लामपूर सत्र न्यायालयाने शेंडगेवाडी खटल्यातून राज ठाकरे यांना दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर इस्लामपूरमध्ये मनसेच्यावतीने जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी 2008 मध्ये राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेडगेवाडी येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान हिंसक वळण लागलं होतं. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर व सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

राजसाहेब ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्यावतीने या गुन्ह्यातून मुक्तता करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घडला त्यावळी ते दोघेही उपस्थित नव्हते, यांच्याविरुध्द खटला चालविण्यासाठी पुरावा नाही. त्यामुळे त्यांची या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी, असा अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT