Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मनसेने छगन भुजबळांना पाठविली सरस्वती मूर्ती

माजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने निषेध केला.

सरकारनामा ब्युरो

MNS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने निषेध केला. तसेच भुजबळ यांच्या घरी सरस्वती मूर्ती पाठवून दिली आहे.

या मूर्ती बरोबर पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे की, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका खासगी कार्यक्रमात आपण महापुरुषांच्या बाबतीत वक्तव्य करताना विद्येची देवता म्हणून सकल हिंदू समाज ज्यांची पूजा करतो अशा सरस्वती देवीचा आपण अपमान केला. आज त्याच सरस्वती देवीचा तुम्हाला देखील आशीर्वाद लाभला आहे. म्हणून तुम्ही वाचू बोलू शकता आपण हे विसरलात. विद्यार्थ्यांना शिक्षणात सरस्वती मातेची प्रार्थना शिकवणारा आपला देश आहे आणि आपण या मध्ये चुकीच्या पद्धतीने मत मांडत आहात याचा आम्ही निषेध करतो. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याचा देखील आपण अपमान करीत आहात, कारण स्वतः क्रांतिज्योतींचे हे वाक्य आहे "ही शाळा नाही तर हे सरस्वती देवीचं मंदिर समजून उपासना करा". धर्मात आधीच अधर्मी लोकांचा धुमाकूळ चालला असताना आपण या प्रकारे वक्तव्य करणं आपल्या सारख्या उच्च पदाच्या व्यक्तीमत्वाला शोभत नाही. या मुळे असंख्य हिंदू बांधवांची मनं दुखावली गेली आहे तरी आपणास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सरस्वतीची प्रतिमा पाठवत आहोत तरी आपण हिंदू बांधवांची माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त करीत माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, संदीप भांबरकर, राहुल वर्मा, डॉ.संतोष साळवे, राहुल फुलारे, प्रवीण गायकवाड, आदेश गायकवाड, महेश चव्हाण, विजय पाचरणे, सागर गडकर, सोमनाथ ढवारे आदी उपस्थित होते.

सुमित वर्मा म्हणाले, जातीवादाला फाटा देऊन आज हिंदू धर्माच्या एकीकरणाकडे लक्ष देणे गरजेचे असताना आपल्या कडून बेजबाबदार पणा घातक ठरेल. आपण विविध पदांवर काम केलेले आहे आपण शांतता समानतेचा संदेश द्यायला हवा तर तुम्ही वेगळेच काहीतरी समोर मांडत आहात ज्याने समाजातील दरी वाढत जाईल, हिंदू धर्मातील सर्व जाती एकत्रीत याव्या असे आपणांस वाटत नाही का ? सरस्वती देवीचा अपमान करून तुम्ही काय मिळवणार आहात ? अभ्यासक्रमात मराठी विषयाच्या पाठ्य पुस्तकातील सरस्वती देवीचा फोटो जसा तुम्ही लोकांनी सरकार च्या माध्यमातून गायब केला तसा आता सरस्वती पुजनाबाबत घाट घातला जात तर नाही ना. आपण समस्त हिंदू बांधवांची माफी मागायला हवी ही आपल्या कडून अपेक्षा व्यक्त करीत आहोत अशी मागणी वर्मा यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT