Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : ब्रिजभूषणवर कारवाईला मोदी सरकार घाबरतंय : पृथ्वीराज चव्हाण

Modi Government महागाई, बेरोजगारी, महिला, युवतींवर अन्याय, अत्याचार, शेतकरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, उद्योगधंद्यांची झालेली पीछेहाट आदी मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहोत.

Umesh Bambare-Patil

Satara Congress News : भाजपचा उत्तर प्रदेशातील तो दबंग, बाहुबली खासदार ठाकूर समाजातील आहे. तसेच तेथील अनेक जिल्हयात त्यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे मोदींचे सरकार त्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस Congress भवनात आढावा बैठकीनंतर श्री. चव्हाण Prithviraj Chavan यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. श्री. चव्हाण म्हणाले, मोदींच्या नऊ वर्षांच्या कारभारावर काँग्रेस अंकुश ठेवणार आहे. महागाई, बेरोजगारी, महिला, युवतींवर अन्याय, अत्याचार, शेतकरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, उद्योगधंद्यांची झालेली पीछेहाट आदी मुद्यांवरुन मोदी सरकारला Modi Government घेरणार आहोत. काँग्रेसने संघटीत लढा दिल्यास मोदींचा पराभव होवू शकतो.

महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सात तक्रारी दिल्ली पोलिसांत दाखल आहेत, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यामुळे खासदार ब्रिजभूषण सिंह याला कायद्याप्रमाणे अटक केले पाहिजे. यातील एक तक्रार पोक्सोअंतर्गत दाखल करण्यात आली आहे. मात्र ब्रिजभूषण यांच्यावर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत.

भाजपचा उत्तर प्रदेशातील तो दबंग, बाहुबली खासदार असून ठाकूर समाजातील आहे. तसेच अनेक जिल्हयात त्यांचा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे मोदींचे सरकार त्यावर कारवाई करण्यास घाबरत आहे. स्वत: पंतप्रधानांनी याविषयी चाकर शब्द काढलेला नाही. यातून मोदींचा बेटी बचाव, बेटी पढाओ चा नारा फेल ठरत आहे. त्याला अटक करुन कडक शिक्षा झाली पाहिजे. या मुद्यावर काँग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT