Datta Tapare-Shahaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu Vs Mohite Patil : मोहिते पाटील समर्थकांचा शहाजीबापूंवर पलटवार: ‘ज्यांचा फक्त रात्रीच पाण्याशी संबंध येतो, त्यांनी...’

भारत नागणे

PandharPur News : कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या श्रेयावरून मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला असताना त्यात सांगेाल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली. या योजनेसाठी मोहिते पाटील यांनी नव्हे; तर खासदार निंबाळकर यांनी प्रयत्न केले, असे म्हटले होते. त्याला मोहिते पाटील गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘ज्यांचा फक्त रात्रीच्या वेळी पाण्याशी संबंध येतो, त्यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणावर बोलू नये’ असा पलटवार सांगोल्यातील मोहिते पाटील समर्थक दत्ता टापरे यांनी केला. (Mohite Patil's supporter's reply to MLA Shahaji Patil)

कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी मोहिते पाटील यांनी नव्हे;तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत, दावा सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे. शहाजी पाटील यांच्या विधानानंतर जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोहिते पाटील समर्थक आमदार शहाजी पाटील यांच्या वक्तव्यानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मोहिते पाटील यांचे सांगोला येथील समर्थक दत्ता टापरे यांनी आमदार शहाजी पाटील यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवरून वाद सुरू आहे. भाजपच्या या दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या आहेत. त्या वादात सांगल्याचे आमदार शहाजी पाटील हे उतरले आहेत. त्यांनी या योजनेसाठी खासदार निंबाळकर यांनी प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना डिवचण्याचे काम केले आहे.

शहाजी पाटील यांच्या टीकेला सांगोला येथील मोहिते पाटील समर्थक दत्ता टापरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यावर आमदार पाटील काय बोलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राज्य सरकारसमोर मांडली होती. त्यावेळी सर्वच मंत्र्यांनी त्याचे स्वागत केले होते, असे टापरे यांनी सांगितले.

कृष्णा खोऱ्यातील पावसाचे वाहून जाणारे पाणी या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला मिळणार आहे. कोणी कितीही वल्गना केल्या तर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना कोणी मांडली आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. या योजनेतील ‘क’सुद्धा ज्यांना माहिती नाही, त्या बोलघेवड्या आमदार शहाजी पाटील यांनी खासदार निंबाळकर यांना श्रेय देणे म्हणजे हास्यास्पद आहे, असा टोलाही टापरे यांनी लगावला.

'पाणी' या शब्दाशी ज्यांचा फक्त रात्रीच्या वेळी संबंध येतो, त्या आमदार आणि खासदार यांनी या योजनेचे श्रेय लाटू नये, असा सल्लाही टापरे यांनी दिला. त्यामुळे कृष्णा-भीमा योजनेवरून सोलापूर जिल्ह्यातील राजकारण आखणी तपाण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT