monika rajale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोनिका राजळे म्हणाल्या, विरोधकांच्या टिकेची पर्वा नाही...

आमदार मोनिका राजळे ( MLA Monika Rajale ) यांनी प्रताप ढाकणे ( Pratap Dhakane ) यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली.

सरकारनामा ब्युरो

पाथर्डी ( अहमदनगर ) : राज्यात महाविकास आघाडीतील नेते व भाजप नेत्यांतील आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. अशातच पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघातील भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली. Monica Rajale said that I does not care about the criticism of the opposition...

पंचायत समिती सदस्या मनीषा वायकर यांच्या निधीतून माळीबाभूळगाव येथे विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी आमदार राजळे बोलत होत्या. भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सोमनाथ खेडकर, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, राहुल राजळे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, एकनाथ आटकर, नामदेव लबडे, रवींद्र वायकर, मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड उपस्थित होते.

आमदार राजळे म्हणाल्या, प्रामाणिकपणे जनतेची कामे करत राहिलो, तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहते, हे आपण दोन विधानसभा निवडणुकांत अनुभवले आहे. त्यामुळे आपण विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नसून, जनतेची कामे करत राहू, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी लगावला.

राजळे पुढे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी म्हणून आम्ही अहमदनगर येथे उपोषण केले, तर काहींनी आमच्यावर टीका केली. ही टीका आमच्यावर नसून नुकसानग्रस्तांचा अपमान आहे. राजकारण कोठे करावे, याचे भान काहींना राहिले नाही. तालुका विकासाच्या प्रवाहात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. आर. बी. शेख यांनी प्रास्तविक केले. राजू सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. रशीद शेख यांनी आभार मानले.

दुष्काळी तालुका ओळख मिटली

जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात पूर आल्याचे महाआघाडीचा एक नेता म्हणाला. मात्र या योजनेमुळे अनेक गावे समृद्ध झाली असल्याचे या नेत्याला समजले नाही. दुष्काळी तालुका ही पाथर्डीची ओळख आता संपली आहे, असे यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT