Ajit Pawar, Jayant Patil
Ajit Pawar, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News: राष्ट्रवादीत भाकरी फिरणार? बॅनर अजितदादांचे : पण खासदार म्हणतात जयंत पाटीलच मुख्यमंत्री...

सरकारनामा ब्यूरो

Amol Kolhe News : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक बॅनर राज्यात लागले आहेत. त्यातच अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे, की अजित पवार मुख्यमंत्री होतील. तसचे स्वत: अजित पवार यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याने नवीन चर्चा सुरु झाली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी सांगली दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील (Jayant Patil) हेच भावी मुख्यमंत्री असतील, असे मत मांडले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुप्त संघर्षा आहे का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

अजित पवार यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा रंगत असताना पुण्यानंतर आता नागपुरातही पवारांच्या समर्थनात बॅनरबाजी सुरू आहे. या बॅनरवर 'वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का' असा मजकूर बॅनर लावले आहे.

जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटील ताकदीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्ते केले होते. मुंबई (Mumbai) विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पवार बोलत होते. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT