Udayanraje Bhosale, Shivenraraje Bhosale

 

 sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत ; उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना डिवचलं

शिवेंद्रसिंहराजे यांनी साताऱ्यात नारळ फोडयांची गँग आली असल्याची टीका सातारा विकास आघाडी आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. त्याला आज उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले.

सरकारनामा ब्युरो

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP UdayanRaje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांच्यातील वाद नवीन नाही, दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विकासकामावरुन आता उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे. कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि धरणाचे पाणी सोडण्याच्या स्वयंचलित गेटचे पूजन प्रसंगी ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, ''आम्ही नारळ वाढवतो ते कामाचे वाढवितो. नारळ वाढविणे ती एक प्रथा, परंपरा आहे. आम्ही कधी कुणाची घरे फोडली नाहीत. ज्या लोकांनी स्वत: च्या आयुष्याची पुंजी, आयुष्याची कमाई विश्वासाने घराण्याकडे बघून तुमच्या बॅंकेत ठेवली. त्यांची काय अवस्था आहे. आम्ही कोणती घरफोडी केली नाही, वाटोळ केलं नाही,''

उदयनराजे म्हणाले की, काही काम झालं की आम्ही केल म्हटलं जाते. वय वाढलं पण यांची बुध्दी लहान मुलांपेक्षा कमी होत गेलेली आहे 'नारळफोडी गॅंग हो' आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही काम करतोय, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाणे मी कमी समजतो. परंतु दिशाहीन झालेले अत्यंत सकुंचित वृत्तीची काही लोक असतात त्याच्याकडून फार अपेक्षा करणे चुकीचे आहे.

सातारा शहराची जलसंजीवनी असलेल्या कास धरण क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कास-बामणोली पर्यायी रस्त्याचा भूमिपूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा विकास आघाडीचे पक्ष प्रतोद निशांत पाटील, सुजाता राजे महाडिक, सीता हादगे आदींसह बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जल प्राधिकरण, सातारा नगरपरिषद व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मध्यन्तरी साताऱ्यात नारळ फोडयांची गँग आली असल्याची टीका सातारा विकास आघाडी आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केली होती. त्याला आज उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT