Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना सुनावलं ; म्हणाले, "कोश्यारींचा राजीनामा घेण्यात .. "

Maharashtra New Governor Ramesh Bais : निवृत्तीचे वय ठरवलं पाहिजे," असे उदयनराजे म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra New Governor Ramesh Bais : ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’,अशा शब्दांत भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी टीका केली. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही राज्यपाल्यांच्या राजीनाम्यावर भाष्य करीत राज्यकर्त्यांना सुनावलं आहे.

"राज्यपालपदी नियुक्ती करताना वयाचा विचार करावा हवा, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीनं विधान करणं गरजेचे आहे. महापुरुषांबाबत विधान करताना काळजी घ्यावी. महापुरुषांचे आदर करण हे आपलं कर्तव्य आहे. शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही," असे उदयनराजे म्हणाले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जर राज्यकारभारात लोकांचा समावेश केला नसता, तर आजही राजेशाही असती. सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाण्याची संकल्पना छत्रपती शिवरायांनी मांडली. जर महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर या देशाचे किती तुकडे होतील. जसं आता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. तसंच युनायटेड स्टेट ऑफ इंडिया होईल.’, असे ते म्हणाले.

"राज्यपालांची नियुक्ती करताना वयोमर्यादेचा विचार करावा, राजकारणातही विविध पदावर तरुणांना संधी दिली पाहिजे. राजकारणातही वयाची मर्यादा असावी. निवृत्तीचे वय ठरवलं पाहिजे," असे उदयनराजे म्हणाले.

"भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात करण्यात उशीर झाला आहे. वेळेत निर्णय घेतला असता तर बरचं सावरता आले असते. माझ्या त्यांच्याबाबत व्यक्तीव्देष नाही, मी अन्यायाच्या विरोधात मी लढत असतो," असे ते म्हणाले.

कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यावर ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर निशाणा साधत नव्या राज्यपालांना सल्ला दिला आहे. महाराष्ट्राला रमेश बैंस (Ramesh Bais) हे नवीन राज्यपाल मिळाले आहेत.

संजय राऊत म्हणाले, "भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये,"

"नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस माहित नाही. मात्र नवीन राज्यपालांचे आम्ही स्वागत करु. मात्र त्यांनी घटनेनुसार काम करावे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, बैस हे सुस्वभावी आहेत. मात्र विरोधी पक्षाचा आवाज त्यांनी ऐकावा," असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT