Udayanraje Bhosale, Ajit Pawar
Udayanraje Bhosale, Ajit Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ईडीच्या माध्यमातून त्या लोकांचा पैसा पुन्हा जनतेत येणार आहे...

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : जे पेरतो तेच उगवते, ज्यांनी पेरले त्यांना माहिती आहे, आपण काय पेरलंय ते. अशांना शासन झालेच पाहिजे. लोकांचा पैसा निवडणूकीत पुन्हा लोकांपर्यत जातो. तसाच आता ईडीच्या माध्यमातून पैसा पुन्हा लोकांपर्यंत जाणार आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या ईडी व आयकर विभागाच्या कारवाईंवरून लगावला आहे.

साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कोल्हापूरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदतीची बुद्धी देवो, अशी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली. मराठा आरक्षणाची मशाल पुन्हा पेटविण्याची गरज आहे, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, मुळात ज्याला आत्मियता असते, तळमळीने वाटते की हा प्रश्न मार्गी लागावा, अशा माणसाच्या हातात मशाल दिली जाते. मुळात मशालच अशा माणसाच्या हातात दिली, त्यांनी त्याकडे संपूर्ण दूर्लक्ष केले. त्यामुळे एकमेकांवर ढकलण्यापेक्षा दहा वर्षानंतर जनगणना होते, आता कशाला वाद करायचा.

लोकसंख्येच्या आधारावरच आरक्षण देणार आहात ना, मग पुन्हा जनगणना करा व मराठा समाजाला आरक्षण देऊन टाका, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील कालावधीत जग वेगाने पुढे जातंय. मेरिट हाच क्रायटेरिया यापुढे पकडला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा वाढणार आहे. यामध्ये प्रत्येकाला बुध्दी दिलेली आहे. आपण परिश्रम किती घेतोय त्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. मराठा समाज एकत्र नसल्याने हे सर्व होत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे, याविषयी ते म्हणाले, उदयनराजे असो, संभाजीराजे असो की नरेंद्र पाटील असतील, या सर्वांसाठी एक विचार दिला पाहिजे. एखादा शासन निर्णय काढून बाकीच्यांना आरक्षण दिले जाते. मग मराठा समाजाला का आरक्षण दिले जात नाही. काढा शासन निर्णय आणि देऊ टाका आरक्षण, असे ही त्यांनी नमुद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या ईडी व आयकर विभागाच्या कारवाई विषयी विचारले असता, उदयनराजे म्हणाले, आपण जे पेरतो तेच उगवते ना. ज्यांनी पेरले त्यांना माहिती आहे, आपण काय केलंय. त्यांना शासन झालेच पाहिजे, पक्ष कोणताही असु देत. शेवटी लोकांचा पैसा आहे, निवडणूकीत तो पुन्हा लोकांपर्यंत जातोच. तसे आता हे ईडी एक माध्यम झाले आहे. लोकांपर्यंत पैसे परत देण्यासाठीचे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचा बंद यशस्वी झाला असे वाटते का, यावर उदयनराजे म्हणाले, केवळ बंदने प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांविषयी प्रत्येकाला अस्था असेल तर त्यांच्या अडीअडचणींचे निवारण केले पहिजे. जेवढे प्रगत देश आहेत. तेथे शेतकऱ्यांना एक स्टेटस दिलेले आहे. म्हणून तेथील शेतकरी प्रगत आहेत. आपले शेतकरी पहा, निवडणूक आली की प्रत्येकजण बेंबीच्या देढापासून ओरडत असतात.

एवढे बोलतात की त्यांच्याशिवाय कोणाला तळमळच नाही. आजपर्यंत त्यांना स्टेटस का मिळाले नाही. सबसिडी दिल्या जातात त्या कोणाला दिल्या जातात. शेतीशी निगडीत व्यवसाय असतील त्यांनाच सवलती दिल्या जातात. मुळातच ते फायद्यात असतात. वर्षाला कित्येक लाख कोटींमध्ये सबसिडी दिली जाते. हा फायदा त्यांना देण्यापेक्षा याचे एकत्रिकरण करून प्रत्येक शेतकऱ्यांला दिले तर त्याचा चांगला उपयोग होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT