MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदार उदयनराजेंची हटके स्टाईल आणि दिलदारपणा...

Umesh Bambare-Patil

सातारा : खासदार उदयनराजेंची हटके स्टाईल आणि गोरगरीबांना मदत करण्याचा त्यांचा दिलदारपणाही सातारकरांना माहिती आहे. आज त्यांनी साताऱ्यातील एका पेट्रोल पंपावर भर उन्हात पोस्टर व कॅलेंडर विकणाऱ्या मुलीला पाहिले व त्यांचे मन हेलावले. त्यांनी तातडीने तिच्याकडून सर्व पुस्तके व कॅलेंडर विकत घेतली. ही पुस्तके त्यांनी आनंदाश्रम मधील मुलांना देण्याची सूचना आपल्या सोबतच्या कार्यकर्त्याला केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या हटके स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. एखाद्या गोरगरीबांना मदत करतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ज्यामध्ये ते लोकांबरोबर लहान मुलांबरोबर बोलत असल्याचे पहायला मिळते. आज सकाळी साताऱ्यातील एका पेट्रोल पंपावर खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी इंधन भरण्यासाठी थांबली होती.

त्यावेळी त्यांचे लक्ष भर उन्हात एक कॅलेंडर आणि पुस्तके विकणाऱ्या लहान मुलीकडे गेले. त्यांचे मन गहिवरले. त्यांनी तातडीने त्या मुलीला जवळ बोलावून घेतले व तिची विचारपूस केली. तसेच तिच्याकडील सर्व पुस्तके आणि कॅलेंडर पैसे देऊन स्वतः विकत घेतली. त्यानंतर ही सर्व पुस्तके व कॅलेंडर त्यांनी जवळच असलेल्या आनंदाश्रमातील मुलांना देण्याची सूचना कार्यकर्त्याला केली. याबाबतचा व्हिडीओ सकाळी व्हायरल झाला आणि त्यांच्या या दिलदारपणाचे सातारकरांसह नेटीझन्सने कौतूक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT