MP Dr. Sujay Vikhe Patil & Shivaji Kardile Paresh Kapase
पश्चिम महाराष्ट्र

खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आज महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिले.

Amit Awari

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022ला संपत आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय हलचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषद व पंचायत समित्याची निवडणूकही अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. त्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज महत्त्वपूर्ण राजकीय संकेत दिले. MP Vikhe said, Kardile will be the MLA ...

नगर तालुक्यातील जेऊर गटातील शेंडी येथे युवा कार्यकर्ते दत्ता तापकीरे यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या प्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाला शिवाजी कर्डिले, अक्षय कर्डिले, बाजीराव गवारे, रावसाहेब कर्डिले, सागर कर्डिले,राजू शेटे,मच्छिंद्र कराळे, बबलू सुर्यवंशी, बाप्पू दाणी, अहमदनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, जनता प्रश्न सोडवणाऱ्याच्या पाठीमागेच भक्कमपणे उभी राहते. शिवाजी कर्डिले यांनी 30 वर्षे जनतेचे प्रश्न सोडविल्यामुळे आजही जनता त्यांच्या बरोबर आहे. विखे कुटुंबावरही जनता 50 वर्षांपासून भरभरून प्रेम करत आहे. शिवाजी कर्डिले हे आमदार होणारच आहे, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

शिवाजी कर्डिले यांनी युवा कार्यकर्त्यांना निवडणुकीतील विजयाचा मंत्र देताना सांगितले, जनतेत राहून प्रश्न सोडविल्यास जनता बरोबर राहते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जो उमेदवार जनतेत राहून काम करत असेल त्याचा विचार केला जाईल. विखे कुटुंबीयांशी आमचे जवळचे संबंध आहे कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी मला अपक्ष आमदार करण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मी त्यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून माझी जिल्हाभरात ओळख होती. आता ही माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी आजही ते ऋणानुबंध आहेत तसेच भविष्यातही असेच ऋणानुबंध राहतील असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT