बापूसाहेब कोकणे
टाकळीभान ( जि. अहमदनगर ) : श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) यांच्या लोकसेवा मंडळाला सर्व 21 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे कारखान्यावर पुन्हा मुरकुटे यांचाच झेंडा फडकला. या निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांनी त्यांची सून डॉ. वंदना मुरकुटे ( Dr. Vandana Murkute ) व शेतकरी संघटनेचा पराभव करत 35 वर्षांपासूनची सत्ता राखली. Murkute's 21-0 victory
भानुदास मुरकुटे यांच्या विरोधातील पॅनेलमध्ये त्यांच्याच सून डॉ. वंदना मुरकुटे लढत असल्याने ही निवडणूक राज्यात औत्सुक्याचा विषय ठरली होती. या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया काल (रविवारी) झाली. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानाजवळ असलेल्या गुजराती मंगल कार्यालयात आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. रात्री उशिरा या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.
सर्वसाधारण मतदारसंघ :
टाकळीभान गट - माजी आमदार भानुदास मुरकुटे (6405), ज्ञानदेव पटारे (6929), पुंजाहरी शिंदे (5719).
वडाळा महादेव गट - कोंडिराम उंडे (6686) रामभाऊ कासार (6345), ज्ञानेश्वर काळे (6326).
उंदीरगाव गट - बाबासाहेब आदिक, (6449) वीरेश गलांडे (6430), आदिनाथ झुराळे (6139).
कारेगाव गट - भाऊसाहेब उंडे (6748), प्रफुल्ल दांगट (6375), ज्ञानेश्वर शिंदे (6310).
पढेगाव गट - रावसाहेब थोरात (6405), हिंमतराव धुमाळ (6246), यशवंत बनकर (6150).
महिला राखीव मतदारसंघ - शीतल गवारे (6586), हिराबाई साळुंके (6222).
इतर मागास मतदारसंघ - अमोल कोकणे (6398).
अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ - यशवंत रणनवरे (6624), भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघ - योगेश विटनोर (6085). सोसायटी मतदारसंघ - सोपान राऊत (48 पैकी 43) हे उमेदवार विजयी झाले. शेतकरी संघटनेला खातेही उघडता आले नाही.
‘अशोक’च्या सभासदांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मागील 35 वर्षांपासून सभासद लोकसेवा विकास मंडळाला मतदान करून विजयी करतात. त्यामुळे यापुढेही सभासदांचे हित हीच माझी विश्वासार्हता अशीच टिकून राहील.
- माजी आमदार भानुदास मुरकुटे
‘अशोक’च्या निवडणुकीत आम्ही प्रचारसभेत विचारलेल्या प्रश्नांऐवजी ती वेगळ्या पद्धतीने हाताळली गेली. मात्र, नूतन संचालक मंडळ विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देईल, ही अपेक्षा व त्यांना शुभेच्छा.
- अविनाश आदिक प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
‘अशोक’च्या सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शेतकरी सभासदांच्या हितासाठी आम्ही लढलो, पण हा धनशक्तीचा विजय झाला.
- डॉ. वंदना मुरकुटे
परिवर्तन होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही सभासद, कामगारांवर दबावतंत्राचा प्रभाव दिसून आला. हा जनहिताचा विजय नसून, धनशक्तीचा विजय आहे.
- ॲड अजित काळे, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.