पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Handore : काँग्रेस, महाविकास आघाडीला भीमशक्तीची भक्कम साथ : चंद्रकांत हांडोरे

संविधान बचावची लढाई बाकी आहे. त्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडीला भीमशक्तीची पूर्ण साथ आहे. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्यासमवेत भीमशक्ती भक्कमपणे उभी आहे, असा विश्वास माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी आज येथे दिला.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : संविधान बचावची लढाई बाकी आहे. त्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडीला भीमशक्तीची पूर्ण साथ आहे. सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्यासमवेत भीमशक्ती भक्कमपणे उभी आहे, असा विश्वास माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांनी आज येथे दिला. काँग्रेस उमेदवार पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले,‘‘लोकसभा निवडणुकीत आम्ही संविधान बचावची लढाई लढली आणि जिंकली. भाजपने सातत्याने संविधान बदलाचा प्रयत्न केला. ते अजून थांबलेले नाहीत. भविष्यात निम्म्या राज्यांचा पाठींबा घेऊन ते हा डाव आखू शकतील. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र जिंकायचा आहे. पुरोगामी महाराष्ट्र हे घडू देणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आम्ही विकासाची पंचसुत्री जाहीर केली आहे. महिलांनी महिना तीन हजार रुपये शंभर टक्के मिळतील, शिवाय बसप्रवास मोफत मिळेल. भूलथापांना बळी न पडता भाजपला रोखण्यासाठी मतदान करावे.’’

ते म्हणाले,‘‘खासदार राहूल गांधी यांनी भारत जोडो व भारत न्याय यात्रा काढून संविधान वाचवण्याची लढाई सुरु केली. त्यांचे हात बळकट करा. पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाने ही लढाई अजून मजबूत होईल. कारण, त्यांचा इतिहास बहुजन समाजाला सोबत नेणारा, त्यांच्या विकासाचा विचार करणारा आहे.’’

पृथ्वीराज पाटील म्हणाले,‘‘सांगलीची लढत दुरंगी आहे, यात शंका बाळगू नका. भाजपचा निश्चित पराभव होईल. पाच वर्षे काम केले, आता पाच वर्षे आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्या. भिमशक्ती माझ्या पाठीशी आहे आणि मी आयुष्यभर भीमशक्तीच्या पाठीशी उभा राहणार आहे.’’

पुरोगामी दलित संघाचे डॉ. प्रकाश पेठकर, भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ माने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव नंदकुमार हत्तीकर यांनी पाटील यांच्यासोबत येत असल्याचे सांगितले. प्रा. सुकुमार कांबळे, डॉ. नामदेव कस्तुरे, उत्तम कांबळे, आशिष कोरी, प्रा. गायकवाड, उत्तम मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. सिध्दार्थ माने, मयूर पाटील, मंगेश चव्हाण, मुन्ना कुरणे, उत्तम कांबळे, प्रा. एन. डी. बिरनाळे, आशिष कोरी, प्रा. गायकवाड, उत्तम मोहिते, राम कांबळे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT