Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा : संचालकपदावरही सोडले पाणी

आर्थिक गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक ही राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

अमित आवारी

अहमदनगर - आर्थिक गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक ( Nagar urban bank ) ही राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वीच बँकेची निवडणूक झाली. यातील नूतन संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी आज अध्यक्षपद व संचालक पदाचा राजीनामा बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे अहमदनगर शहरात चर्चेला उधाण आले असून बँकेच्या ठेवीदारांतही चिंतेचे वातावरण आहे. ( Nagar Urban Bank Chairman resigned from the resignation )

अहमदनगर शहरातील नगर अर्बन बँकही 100 वर्षांपेक्षाही जुनी बँक आहे. भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या काळात या बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळाला. हा दर्जा मिळाल्यावर मात्र बँकेचा दर्जा घसरल्याचे आरोप होऊ लागले. यातच बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोपही झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चौकशी करून या बँकेत प्रशासकही नियुक्त केला होता. प्रशासकाकडूनही देणी वसूल होत नसल्याने अखेर निवडणूक घेण्याचे आदेशही रिझर्व्ह बँकेने दिले होते.

त्यानुसार या बँकेची निवडणूक जिल्हा उपनिबंधकांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या निवडणुकीत दिलीप गांधी यांचे चिरंजिव सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाने विजय मिळविला. राजेंद्र आगरवाल यांना अध्यक्ष तर दिप्ती सुवेंद्र गांधी यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. राजेंद्र आगरवाल यांनी बँकेतील देणी वसुलीतील काही तडजोडींवर आक्षेप घेतले. तसेच देणी वसुलीसाठी कठोर पाऊले उचलली त्यामुळे संचालक मंडळ व अध्यक्ष आगरवाल यांच्यात वाद होऊ लागले होते.

दोन-तीन दिवसांपूर्वी बँकेसमोर ठेवीदारांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलकांना आगरवाल भेटण्यासाठी गेले त्यावरूनही वाद झाला होता. संचालक मंडळाशी वाढता वाद लक्षात घेता अखेर आगरवाल यांनी बँकेचे मुख्याधिकारी सतीश रोकडे यांच्याकडे अध्यक्षपद व संचालकपदाचा राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. दीप्ती गांधी यांंच्याकडे बँकेचे अध्यक्षपद देण्यावर सध्या चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT