Nagar Urban Bank Director. MP Dr. Sujay Vikhe Patil was felicitated
Nagar Urban Bank Director. MP Dr. Sujay Vikhe Patil was felicitated Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'नगर अर्बन बँक वाचविणार; दिलीप गांधींच्या मदतीची परतफेड करणार'

अमित आवारी

अहमदनगर : भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर काल ( सोमवारी ) आर्थिक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ठेवीदारांत संभ्रम व भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच अर्बन बँकेचे अध्यक्ष व संचालक हे बँकेला संकटातून बाहेर काढू असा विश्वास ठेवीदारांना देत आहेत. यातच खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) आज नगर अर्बन बँकेत ( Nagar Urban Bank ) जाऊन नूतन संचालकांची भेट घेऊन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँक व केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. 'Nagar Urban Bank will save; Will repay Dilip Gandhi's help '

मागील काही वर्षांपासून नगर अर्बन बँक बचाव कृती समितीकडून बँकेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार रिझर्व्ह बँकेला करण्यात येत होती. रिझर्व्ह बँकेने यासाठी नगर अर्बन बँकेची चौकशी केली. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक नियुक्त केले. अखेर रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक जाहीर केली. ही निवडणूक नगर अर्बन बँक बचाव कृती समिती विरूद्ध तत्कालीन संचालक मंडळाचा सहकार पॅनल अशी झाली. या निवडणुकीत नगर अर्बन बँक बचाव कृती समितीच्या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे सहकार पॅनलचे चार जण बिनविरोध निवडून आले. कृती समितीच्या उर्वरित उमेदवारांनीही निवडणुकीत प्रचारात रस दाखविला नाही.

एकतर्फी निवडणूक पाहून मतदारांनीही निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरविली. केवळ 32.65 टक्के एवढेच मतदान झाले. सहकार पॅनलने सर्व जागा जिंकल्या. 1 डिसेंबरला सहकार पॅनलने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली आणि 6 डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले. त्यामुळे ठेवीदारांत चिंतेच व घबराटीचे वातावरण पसले आहे. यात सहकार पॅनलचे संचालक व नगर अर्बन बँक बचाव कृती समिती अशा दोघांकडूनही वेगवेगळे दावे केले जात असल्याने ठेवीदारांची चिंता वाढली आहे.

अशातच खासदार डॉ. सुजय विखे पाटील नगर अर्बन बँकेतील नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यासाठी आज अर्बन बँकेत आले होते. यावेळी बँकेतर्फे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व उपाध्यक्ष दीप्ती गांधी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी सहकार पॅनेलचे नेते सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ संचालक अशोक कटारिया, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, अजय बोरा, मनीष साठे, कमलेश गांधी, ईश्वर बोरा, राहुल जामगावकर, संपतलाल बोरा, गिरीश लाहोटी, बँकेचे मुख्य व्यवस्थापक सतीश रोकडे, प्रमुख व्यवस्थापक एम. पी. साळवे, वरिष्ठ अधिकारी सुनील काळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव आदींसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार पॅनलवर सभासदांनी विश्वास व्यक्त करून एकतर्फी विजय मिळाल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी मी अर्बन बँकेत आलो आहे. काल सायंकाळी आरबीआयने जरी अर्बन बँकेवर निर्बंध लादले असले, तरी बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका घेत अर्बन बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी खासदार या नात्याने केंद्रीय अर्थमंत्री व आरबीआयकडे पाठपुरावा करणार आहे. माझ्या यशात स्व. दिलीप गांधी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन खासदार डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, अर्बन बँकेवर निर्बंध आले आहेत, असे कळले असले तरी नियोजित कार्यक्रमानुसार मी बँकेत आलो आहे. बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले असताना, अचानकपणे बँकेवर निर्बंध येणे ही दुर्दैवी बाब आहे. पण मला विश्वास आहे की अर्बन बँक पुन्हा सुस्थितीत येईल. बँकेला म्हणणे मांडण्याची संधी मिळावी, यासाठी लवकरात लवकर आरबीआयच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन अर्बन बँकेची बाजू मांडणार आहे. विखे व गांधी कुटुंबीयांचे वर्षानुवर्षे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे स्व. गांधी यांच्या अर्बन बँकेला पूर्ण सहकार्य खासदार म्हणून मी सहकार्य करीन, असेही त्यांनी सांगितले.

मागच्या काही महिन्यांपासून प्रशासक असलेल्या या बॅंकेची नुकतीच निवडणूक झाली आणि नवीन संचालक मंडळ स्थापन झाले आहे अशात रिझर्व बँकेने नव्याने अर्बन बँकेवर अनेक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधानुसार चालू आणि बचत खातेधारकांना आणि ठेवीदारांना एका वेळी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याबरोबरच बँकेतून कोणालाही नव्याने कर्ज मिळणार नाही असे निर्बंध सहा महिन्यासाठी रिझर्व बँकेने घातले आहेत.

- राजेंद्र गांधी, माजी संचालक.

नव्यानेच स्थापन झालेल्या संचालक मंडळ या निर्णयामुळे गोंधळून गेला असून रिझर्व बँकेने कुठलीही आधी सूचना न देता निर्बंध घातले घातले आहेत आम्हीदेखील पुनर्विचार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज दाखल करणार असल्याचे बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हटले आहे.

- राजेंद्र अगरवाल, अध्यक्ष, नगर अर्बन बँक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT