Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : राजे धर्माजी प्रतापराव गर्जेंच्या वंशजाकडून आमदार पडळकरांना नोटीस ! काय आहे प्रकरण ?

Gopichand Padalkar News : कायदेशीर कारवाईचा इशारा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर निरनिराळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा उल्लेख उन्हाळी अधिवेशनात आणि शासनदरबारी स्मारकाच्या निधीसाठी पत्रव्यवहार करताना राजे धर्माजी प्रतापराव मुंडे (गर्जे) असा केल्याने त्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे.

याबाबत वंशज नागनाथ भारतराव गर्जे यांनी आपल्या वकिलांमार्फत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना नोटीस पाठवली असून आडनावात चुकीचे नाव सातत्याने वापरून मानहानी केल्याबद्दल माफी मागून चुकीची दुरुस्ती करावी. उन्हाळी अधिवेशनात केलेला चुकीच्या नावाचा उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यासाठी अध्यक्षांकडे मागणी करावी.

तसेच बीड (Beed) जिल्ह्यातील डाबी या गावातील धर्माजी गर्जे यांच्या स्मारकासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या कडे चुकीचे नावाचे पत्र देऊन मागितलेला दोन कोटीच्या निधीचा दुरुपयोग होऊ नये, अन्यथा आपणा विरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी नोटीस पाठवली आहे.

याबाबत वंशज नागनाथ भारतराव गर्जे (रा. नाथनगर पाथर्डी, ता. पाथर्डी, जि.नगर) यांनी पडळकर यांची त्यांच्या झरे (ता.आटपाडी जिल्हा- सांगली) या गावी भेट घेऊन आद्य क्रांतीकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांच्या बाबतीत उपलब्ध असलेले ऐतिहासिक, धार्मिक पुरावे दाखवले होते. त्यानंतरही केवळ राजकीय फायद्यासाठी पडळकर यांनी गर्जे ऐवजी मुंडे या चुकीच्या नावाचा उल्लेख सातत्याने केल्याचा आरोप नोटिशीत करण्यात आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT