Balasaheb nahata
Balasaheb nahata Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यात नाहाटांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहुर्त ठरला : इतरांचे विखेपाटील प्रेम आडवे येणार?

संजय आ. काटे

NCP News : बहुचर्चित राजकारणी बाळासाहेब नाहाटा यांचा अनेकवेळा लांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला. 3 सप्टेंबरला (शनिवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश श्रीगोंद्यात होत आहे. मंध्यतरी माजी आमदार राहूल जगताप यांच्या मध्यस्थीने विशेष करुन विखे पाटील कुटूंबाला मानणारे काही नेते राष्ट्रवादीत निघाले होते. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय गणिते बदलली असून नाहाटा वगळता इतरांनी विखे पाटील हेच नेते असे सांगत राष्ट्रवादी प्रवेशाला नकारघंटा दाखविल्याचे सध्या तरी दिसतेय.

राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती पद नाहाटा यांना अजित पवार यांच्यामुळेच मिळाले. त्यामुळे नाहाटा आता राष्ट्रवादीत अधिकृतरित्या येत असून, त्यासाठी खुद्द अजितदादा येत आहेत. यापुर्वीच्या घडामोडीत अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, सिध्देश्वर देशमुख या नेत्यांनीही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती व त्यावेळी त्यांची तयारीही होती.

आता मात्र नाहाटा वगळता इतरांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. हे सगळे नेते विखे पाटील कुटूंबाशी जवळीक असणारे आहेत. राज्यात सत्तांतर झाले आणि त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला अशीच स्थिती आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आता मंत्री असल्याने त्यांचे समर्थक वेगळा निर्णय घेवू शकत नाहीत.

दरम्यान राष्ट्रवादी वाढणार असल्याचे संकेत मिळत असतानाच काही नेत्यांनी प्रवेशाबाबत यू-टर्न घेतल्याने नाहाटा हे एकटे प्रवेश करणार हे स्पष्ट होत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी ज्या पटीने वाढायला हवी होती तसे घडलेले नाही. माजी आमदार जगताप व पक्षाचे नेते घनशाम शेलार यांच्यात पक्षीय सुसंवाद नाही हे उघड गुपित आहे.

कार्यक्रमात भलेही ते एकत्र दिसले तरी दोघांचाही सवतासुभा सुरु असतो हे सर्वमान्य आहे. मध्यंतरी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी थेटपणे पक्षावर, नेत्यांवर नाराजी दाखवली होती. या सगळ्या घडामोडीत आता अजित दादा पक्षाची विस्कटणारी घडी नेत्यांचा मेळ बसवून पुन्हा बसविणार का हे पाहावे लागेल.

इतर नेत्यांचे माहिती नाही मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय. यापुढचे राजकारण अजितदादा यांच्याच मार्गदर्शनाखाली करणार आहे.

- बाळासाहेब नाहाटा, सभापती, राज्य बाजार समिती महासंघ

मध्यंतरीच्या घटना वेगळ्या होत्या. आता बदल झाला आहे. जिल्हा परिषदेचे आरक्षण ठिक पडले तर काष्टीतून भाजपची उमेदवारी मागणार आहोत.

- बाळासाहेब गिरमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT