Nana Patole News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole News : 'ऑपरेशन लोटस करण्याची संधीच भाजपला मिळणार नाही..' ; पटोलेंना विश्वास !

सरकारनामा ब्यूरो

Satara News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला लोकांचे मोठे समर्थन मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाला लोक बहुमताने विजय करेल. केवळ काँग्रेस पक्षच सर्व घटकांना बरोबर घेऊन विकास करू शकतो, हा लोकांचा विश्वास आहे. कर्नाटक भाजपला नॅनो कारमध्ये बसावे लागेल, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. आज ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP will not get a chance to do Operation Lotus Nana Patole believe-cz91

“भाजप हा खोटारडा पक्ष आहे. काहीही करून, कशाही प्रकारे सत्ता हस्तगत करणे, हा भाजपचा प्रयत्न असतो. मागच्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसने सरकार बनवलं होतं.मध्यप्रदेश राज्यातही काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. पण, मतदारांचा कौल भाजप मान्य करत नाही. त्यांच्याकडे सीबीआय, ईडी सारख्या सरकारी यंत्रणा आहेत. याचा दुरूपयोग मोदी सरकार करत आहे, हे लोकांना दिसत आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खऱेदी करून महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं. कर्नाटकमध्ये मात्र यावेळी भाजपचा ४० टक्के कमीशनवाल्या घरी बसवण्याचा निर्णय लोकांनी घेतल्याचं दिसत आहे, असे पटोले म्हणाले.

“कर्नाटकात भाजपला पोषक असं वातावरण नाही, त्यामुळे ‘द केरला स्टोरी’ या प्रचारकी चित्रपटाचा आधार घेऊन लोकांमध्ये द्वेष आणि तेढ पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता भाजपाच्या कोणत्याही भुलथापांना लोक बळी पडणार नाही, ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा प्रचार करत भाजपाने काश्मिरी पंडित यांच्यावर जुलूम होत असल्याचा डांगोरा पिटला. जम्मू काश्मीरात राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपचं पूर्ण बहुमतात सत्ता आहे. मग हा अत्याचार थाबवण्यासाठी भाजपने काय केलं ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले. आता मणिपूरमध्येही भाजपचीच सध्या सत्ता आहे. भाजपची सत्ता असलेल्या मणिपूरमध्ये दोन समुदायामध्ये संघर्ष उफाळून येत आहे. एकीकडे मणिपूर जळत असताना, देशाचे पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री हे कर्नाटकामध्ये (Karnataka Assembly News) मताचा जोगवा मागत फिरत आहेत. मात्र कर्नाटकात काँग्रेस पक्षाचं सरकार येत आहे. यामुळे यावेळी भाजपला 'ऑपरेशन लोटस' घडवण्याची वेळच भाजपवर येणार नाही. जनताच भाजपचं ऑपरेशन करणार, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT