Nana Patole News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole News : 'विशाल पाटलांची समजूत काढू, मन मोठं...' ; सांगलीवर पाणी सोडल्यानंतर नाना पटोले काय म्हणाले?

Chetan Zadpe

Sangli News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडेच कायम राहणार, यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सांगली काँग्रेसची विशेषतः विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही नेते नाराज असून सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. यावर आता नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस नेत्यांच्या नाराजीबद्ल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, "स्वाभाविक आहे की आमच्या ज्या जागा यापूर्वीही होत्या. त्यात सांगली असेल, भिवंडी असेल यावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काही ठिकाणी पाऊल मागे घ्यावं लागतं. याबद्दल आम्ही आमच्या नेत्यांना समजावून सांगू. सांगलीत विशाल पाटील यांची आम्ही समजूत काढू. कधी कधी मन मोठं करावं लागतं. आम्ही सर्व नेते मिळून महाविकास आघाडीचं काम करू, " असे नाना पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक नेत्यांची भूमिका काय?

दरम्यान, सांगली मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या (ता. 10 एप्रिल) बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती सांगलीचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.

काँग्रेसन नेते झाले होते आक्रमक -

सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दंड थोपटले होते. विशेषतः आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि सांगलीतील इच्छुक विशाल पाटील (Vishal Patil) यांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेतली होती. हायकमांडपर्यंत जाऊनही सांगलीवरील दावा ठाकरे यांनी सोडला नाही. उलट चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या संजय राऊत यांनी सांगलीची जागा काँग्रेसने विसरावी, असे विधान केले होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT