Nana Patole
Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नाना पटोले म्हणाले, संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार...

अमित आवारी

अहमदनगर - शिर्डी येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरा बाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ( Nana Patole said, Sahyadri will go to the troubled Himalayas to save ... )

नाना पटोले म्हणाले, ज्या पक्षाची जेवढी चादर आहे तेवढेच त्यांनी पाय पसरावेत ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही निवडणूक बिनविरोध होत आली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील लोक ही परंपरा कायम ठेवतील अशी आमची अपेक्षा आहे.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. मी भविष्य व्यक्ता नाही. विरोधी पक्षात भविष्यवाण्या करणारे खूप आहेत. ते रोज सरकार पाडण्याची तारखा सांगतात. रोज झेंडा फडकवतात. अशी भविष्यवाणी मला येत नाही. वस्तुस्थितीला समजून मी आमले मत त्या दिवशी व्यक्त केले. चार उमेदवार निवडून आणण्याऐवढी महाविकास आघाडीकडे मते आहेत. त्यामुळे मी भविष्यवाणी केली नाही. ते उमेदवार निवडून येतील, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे हे शिबिर हिमालय संकटात आला आहे. हिमालयाला वाचवायला सह्याद्री प्रत्येक वेळी गेला आहे. यात यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांचा मोठा इतिहास आहे. आज देशातील सर्वभौमता, देशाचे संविधान वाचवायला हवा. केंद्रातील भाजप सरकारकडून संविधान तोडले जात आहे. देशाला रोज विकले जात आहे. देशातील सार्वजनिक संपत्ती विकण्याचे काम सरकार रोज करत आहे. अशा वेळी देश संकटात आला असल्याने काँग्रेसने शिर्डीत शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून देश वाचविण्याचा बोध घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज गोपाल देवरा यांनी राज्यसभा उमेदवारीवर केलेल्या ट्विटवर नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसपक्षातील 40 ते 50 लोकांचे राजीनामे घेण्याचे काम सुरू झाले आहे. काँग्रेस आपले अस्तित्व सोडून कोणाला मदत करण्याचा काही संबंध येत नाही. कोणी राजकीय फायद्यासाठी चुकीचे सांगत असेल तर त्याला आम्ही विरोध करतो. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. तर भाजपमध्ये हिटलरशाही आहे. त्यामुळे तेथील गोष्टी बाहेर येत नाहीत. काँग्रेस पक्षात कोणी नाराज असेल तर त्याची भेट घेऊन त्याची समजूत काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT