Nana Patole In Pandharpur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole : नशिबात असेल ते होईल; नाना पटोलेंच्या गळ्यात 'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा

Sunil Balasaheb Dhumal

Pandharpur News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या वीणा लक्षवेधी ठरली. यावर, जे काही नशिबात असेल ते होईल, असे म्हणत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली.

आता पटोलेंच्या या विधानवरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून केली आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या नाना पटोलेंच्या Nana Patole गाळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेली वीणा घातली. ती वीणी घालूनच त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पटोले म्हणाले, माझ्या डोक्यावरील फोट आणि गळ्यातील वीणा कार्यकर्त्यांनी घातली आहे. आता जे काही नशिबात असेल ते होईल, असे म्हणत नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होण्याची एक प्रकारे इच्छाच व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत 17 पैकी 13 जागा मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गगनाला पोचला आहे. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्वबळाची भाषाही केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे महाविकास आघडीचा चेहरा आहेत का, या प्रश्नांवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मविआच चेहरा असल्याचे सावध उत्तर दिले होते.

तसेच ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सूत्र मविआत असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पटोलेंचे विधान आणि भावी मुख्यमंत्र्यांची वीणा मविआत वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

आघाडीत काँग्रेसकडे Congress सर्वात जास्त 37 आमदार आहेत. आता लोकसभेत मिळालेले यशाच्या जोरावर काँग्रेस विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ या नात्याने सर्वात जास्त जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेनंतर विधानसभेतही आघाडीकडे लोकांचा कल असल्याचे विश्लेषक सांगतात.

भाजपनंतर काँग्रेसलाच सर्वात जास्त जागा मिळत असल्याचे लोकसभेतून स्पष्ट होते. या सर्व गणितातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री उल्लेख केलेली वीणा घातली. वीणा घालून पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीतील वाद होण्याची शक्यता आहे.

विठ्ठलाला साकडं

पटोले यांनी पंढरपूरमधील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तर बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारकऱ्यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला. तसेच मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेताना नाना पटोले यांनी राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त कर, असे साकडे घातले. तर राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही पटोलेंनी केली. यावेळी यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे Praniti Shinde, नंदकुमार पवार, चेतन नरुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, विजय हत्तुरे, सुरेश हसापुरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT