Nana Patole, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nana Patole On Fadanvis: त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे : नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

Umesh Bambare-Patil

Mumbai Congress News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना आम्ही गुरुजी म्हणणारच कारण ते हिंदूत्वाचा प्रचार करतात, असे सभागृहात सांगितले. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवत त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भिडेंना सरकारचा संपूर्ण पाठींबा असल्याचे सिद्ध होत आहे. माणूसकी संपवणाऱ्या हिंदूत्वाचे फडणवीस समर्थन करतात का, याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी केले.

संभाजी भिडेंच्या Sambhaji Bhide वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनात उमटले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी भिडेंवर गुन्हा दाखल झाला असल्याचे सभागृहात सांगितले. यावेळी त्यांनी भिडे यांचा गुरुजी असा उल्लेख केला. त्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. फडणवीसांच्या या वक्तव्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांना पत्रकारांनी विचारले, त्यावेळी श्री. पटोले यांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असून मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला सरकारचा संपूर्ण पाठींबा दिसत आहे. भाजप व उपमुख्यमंत्री फडणवीस कितीही म्हणाले की भिडे हिंदूत्वाचा प्रचार करतात. तर, मी पण हिंदू आहे.

पण, हिंदू विचारधारेत कोणाचा खून करणे, कोणाला जीवानिशी मारणे हे शिकवलेले नाही. भिडे ज्या पद्धतीचे वक्तव्य करतात, त्याचे समर्थन केलं जातंय. फडणवीस हिंदू प्रचारक म्हणत असतील तर भिडे कोणत्या हिंदूत्वाचा प्रचार करतात. वारकरी प्रथेचा की धारकरी प्रथेचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

धारकरी प्रथा म्हणजे कोथळा काढणारे. त्यांनी ज्या पद्धतीने दाभोळकरांचा कोथळा काढला त्यापद्धतीने त्यांच्या समर्थकांनी आमच्या आमदार यशोमती ठाकूर यांनाही धमकी दिली आहे. त्यामुळे माणूसकी संपवेल अशा हिंदूत्वाचे फडणवीस समर्थन करत आहेत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT