Nana Patole  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नाना पटोलेंचा दणका, एकाचे निलंबन

अखेर काँग्रेसचे ( Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी किरण काळे ( Kiran Kale ) यांच्या विरोधात सातत्याने पत्रकबाजी करत असलेल्या बाळासाहेब भुजबळ यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

Amit Awari

अहमदनगर : काँग्रेसने अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी किरण काळे यांना बसविल्यापासून अहमदनगर शहरात काँग्रेसमध्ये दोन गट दिसून येत होते. अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी किरण काळे यांच्या विरोधात सातत्याने पत्रकबाजी करत असलेल्या बाळासाहेब भुजबळ यांचे पक्षातून निलंबन केले आहे. भुजबळ यांच्यावर काँग्रेस पक्षाची बदनामी करीत पक्ष प्रतिमा मलिन करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील लेखी आदेश प्रदेशाध्यक्षांनी मुंबईतून काढले आहेत. Nana Patole's bang, suspension of one

पटोले यांनी भुजबळांवर पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप ठेवत 8 सप्टेंबर 2021ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याबाबत भुजबळ यांनी उबेद शेख, श्याम वागस्कर, फिरोज शफी खान, अभिजित कांबळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची मागील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन आपला खुलासा सादर केला होता. भुजबळ यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांची हकालपट्टी करीत मनोज गुंदेचा यांची तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने काळे यांनी वर्णी लावल्यानंतर जुनी शहर काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त झाली. काळे यांना काँग्रेसमधीलच जुन्या कार्यकर्त्यांचा विरोध होता. या संदर्भात जुन्या कार्यकर्त्यांनी किरण काळे यांच्या विरोधात प्रदेश कार्यकारिणीकडे निवेदनेही दिली होती.

किरण काळे यांचा आरोप

किरण काळे यांनी सरकारनामाशी बोलताना, बाळासाहेब भुजबळ हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थन होईल अशा पद्धतीने तसेच जिल्हाध्यक्ष काळे यांच्या व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भूमिके विरुद्ध भूमिका घेत पक्षाच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT