Eknath Shinde & Other Leader
Eknath Shinde & Other Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नारायणआबा टेन्शन घेऊ नका; सर्व काही ठिक होईल : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला 'हा' शब्द

​अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : नारायणआबा (Narayan Aba Patil) टेन्शन घेऊ नका, सर्वकाही ठीक होईल, असे सांगून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसह करमाळा तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी करमाळा (Karmala) तालुक्याबरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांनाही दिले. (Narayanaaba Don't Take Tension; Everything will be fine : Eknath Shinde)

करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री राम शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आदिनाथ कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. या दिग्गजांच्या तावडीतून हा कारखाना वाचवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांनी विशेष प्रयत्न केले. तानाजीराव सावंत यांनी या कारखान्यासाठी विशेष मदत केली आहे. हा कारखाना सुरळीतपणे चालणार आहे, यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. हा कारखाना सुरळीत चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रकारची मदत केली जाईल.

करमाळा तालुक्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत. त्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत पुढाकार घेत आहेत.  ज्या पद्धतीने कारखान्यासाठी एकत्र आलेला आहात, त्याच पद्धतीने एकत्र या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी रश्मी बागल यांना या वेळी केले. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी चालूचे बिल भरले पाहिजे, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.

माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिटेवाडी योजना, ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. त्यामुळे तालुक्यातील शेती मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येईल त्यामुळे ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.

नारायण पाटील यांच्या मागणीचा धागा पकडून रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची आश्वासन दिले. गेली अडीच वर्षात महाराष्ट्रात एकाही उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली नाही. मात्र, करमाळा तालुक्यात रिटेवाडी उपसा सिंचन सारखी योजना राबवल्यास 30 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे यासाठी तात्काळ जलसंपदा विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा शब्द दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT