Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nashik Graduate Constituency : 'सत्यजित तांबे अपक्ष लढणार असतील तर.. ; राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

सरकारनामा ब्युरो

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे अपक्ष म्हणून उभे राहिल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. सरकारमध्ये असताना ज्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय होता तसाच समन्वय विरोध असताना सुद्धा असायला हवा होता, तरचं आपण सर्व लढाया एकत्रितपणे लढू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांच्या या निर्णयामागे यामध्ये भाजपचाच हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तसेच, ते सत्यजित तांबे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. सत्यजित तांबे यांनी कॉंग्रेसला धोका दिल्याचा आरोप आता कॉंग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यानंतर आता या सर्व घडामोडींनंतर संजय राऊत यांनी निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.

सत्यजित तांबे यांच्या चुकीला तेच जबाबदार आहेत. विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी महाविकास आघाडीतल्या पक्षांनी बसून चर्चा करून निर्णय घ्यायला हवे होते, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. महाविकास आघाडी कडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक संदर्भात निर्णय होऊ शकतो. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशा पद्धतीने रणनीती महाविकास आघाडी कडून आखणी जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत झालेला गोंधळ मान्य करावाच लागेल. पण काँग्रेस पक्ष समजून नव्हे तर महाविकास आघाडी समजूनच त्याकडे पाहायला पाहिजे. पदवीधरच्या पाचही जागा संदर्भात सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यायला पाहिजे होता. नागपूर, अमरावती जागे संदर्भात काळजीपूर्वक निर्णय होणे अपेक्षित होतं पण तसही झालं नाही, मी कुणाला दोष देत नाही, अशीही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT