Nashik Graduate Constituency | Nana Patole| Balasahe thorat Sarkarnama News
पश्चिम महाराष्ट्र

Nashik Graduate Constituency : थोरातांची भूमिका काय?; नाना पटोलेंनी स्पष्टचं सांगितलं

तांबे पिता पुत्रांच्या या खेळीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला.

सरकारनामा ब्युरो

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय, हे तुम्ही त्यांनाच का विचारत नाही? त्यांचे फोन सुरू आहेत. माझ्याशी ते फोनवर बोलतात, मग तुमच्याशी का बोलत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांनाच केला.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. कॉंग्रेसने उमेदवारी देऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. तांबे पिता पुत्रांच्या या खेळीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यानंतर कॉंग्रेसने दोघांवरही निलंबनाची कारवाई केली. या सर्व प्रकाराबाबत माध्यंमांच्या प्रश्नांना नाना पटोले यांनी उत्तरे दिली आहे.

उमेदवारीसाठी दोघांमध्ये जर काही वाद असतील तर ते सोडवता येऊ शकतात. पण घरातच बाप-लेकामध्ये वाद असतील तर पक्ष त्यांच्या घरात हस्तक्षेप करू शकत नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले. पण १२ जानेवारीला माझे व डॉ. सुधीर तांबे यांच्यात झालेले बोलणे मी गुलदस्त्यात ठेवले आहे. वेळ आली तर तेही मी जाहीर करणार, असाही इशाराही पटोले यांनी दिला.

मग भाजपला नाशिकमध्ये उमेदवार का मिळाला नाही ? भाजपमध्ये लोकशाही राहिली नाही का ? असे प्रश्न विरोधक म्हणून आम्हालाही पडले आहेत, त्याची उत्तरे भाजपने द्यायला हवीत. पण भाजप जर सत्यजित तांबेंना छुपा पाठिंबा देत असेल तर त्याचे स्वागत करतो. पण कॉंग्रेस कार्यकर्ते याचा ३० जानेवारीला विचार करतील, असे सूचक विधानही पटोले यांनी केले.

उमेदवारी अर्झ भरायला तांबे पिता-पुत्र गेले. पण पित्याऐवजी पुत्राने अपक्ष उमेदवारी दाखल केली. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्यासाठी आम्ही भेटणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यातून आम्ही काय समजायचे, असा सवाल करून पटोले म्हणाले, पक्षांतर्गंत दोघांतील वाद आम्ही मिटवू शकतो, पण घरातील बाप-लेकाचे वाद आम्ही कसे मिटवणार? त्यामुळे पक्षाला दोष देऊ नका व बदनामही करू नका. पक्षाचे कोठेही चुकलेले नाही. असंही यावेळी पटोले यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT