Nashik Graduate Constituency : Satyajeet tambe : Shubhangi Patil
Nashik Graduate Constituency : Satyajeet tambe : Shubhangi Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nashik : पदवीधरच्या प्रचार तोफा थंडावल्या : शेवटच्या सभेत तांबे-पाटील मतदारांना काय म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या थोफा आता थंडावल्या आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. पारनेर तालुक्यात शुभांगी पाटील या भावूकसुद्धा झालेल्या पाहायला मिळाल्या.मतदारांनी आपल्याला विजयी करावं यासाठी त्यांनी आवाहन केलं, यावेळी त्यांना अश्रू अनावर झालं.

तर दुसरीकडे तांबे यांनी म्हंटले की, 'मी गेली २२ वर्षे काँग्रेस पक्षात (Congress) काम करतो आहे. आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये २०३० मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, एबी फॉर्म न आल्याने तांत्रिक कारणामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे, असे नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्पष्ट केले.

नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवरच सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अहमदनगरमध्ये सभा घेत प्रचाराची सांगता आज केली. यानिमित्त त्यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून विविध विषयावर भाष्य केलं.

''सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी या मतदारसंघात मागील पंधरा वर्षात सर्वांशी चांगले ऋणानुबंध जपले आहेत. त्यामुळे मला प्रचार करताना चागंला फायदा झाला. तसेच सर्वांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. त्यामुळे माझ्या वडीलांनी केलेले काम मी पुढे घेऊन जाणार आहे'', असं ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT