Sharad Pawar| Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati News : शरद पवार गोविंदबागेत तर अजित पवार काटेवाडीत दिवाळी पाडवा साजरा करणार

Pawar Family Diwali Celebration: पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीत बारामतीत एकत्र जमतात. मात्र, यंदाची दिवाळी पवार कुटुंबीय कशी साजरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर आता पवार कुटुंबीय दिवाळी देखील वेगवेगळी साजरी करणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Baramati News, 01 Nov : पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीत बारामतीत एकत्र जमतात. मात्र, यंदाची दिवाळी पवार कुटुंबीय कशी साजरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर आता पवार कुटुंबीय दिवाळी देखील वेगवेगळी साजरी करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडला साजरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार काटेवाडी येथील निवासस्थानी शनिवारी (ता. 2) रोजी लोकांशी संवाद साधणार आहेत.

विधानसभा प्रचारानिमित्त अजित पवार शुक्रवारी बारामती (Baramati) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त आपण काटेवाडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे यंदा मोठ्या पवारांची दिवाळी गोविंदबागेत तर अजितदादांची काटेवाडी येथे साजरी केली जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटत असतात. मात्र, अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये (Ajit Pawar) मोठी दरी निर्माण झाली.

त्यानंतर लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्यानंतर पवार कुटुंबातील अंतर वाढतच गेलं. अशातच आता बारामती विधानसभेला तर अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.

त्यामुळे यंदाचा दिवाळी पाडवा पवार कुटुंबिय कसं साजरं करणार याची दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली होती. अशातच अजित पवारांनी काटेवाडीत आपण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना भेटणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे यंदा गोविंदबाग आणि काटेवाडी अशा दोन ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT