Sharad Pawar Kolhapur News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar News : बाप हा बापचं असतो...: कोल्हापुरात बॅनरबाजी ; "योद्धा पुन्हा मैदानात.."

NCP News : दसरा चौकातून पवार कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी (ता. २५) कोल्हापुरात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे. "बाप हा बापच असतो," आणि "योद्धा पुन्हा मैदानात" असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरबाजीने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये उद्या (शुक्रवारी) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज हे असणार आहेत.

सभेपूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यभर सभा घेण्यास प्रारंभ केला आहे. येवला, बीडनंतर आता पवारांची कोल्हापुरात सभा होत आहे. दसरा चौकातून पवार कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापुरातील सभेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, “शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्षे आम्ही सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT