Satara ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : भाजपला मत देणाऱ्या बंडखोर ZPसदस्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक : '90 दिवसांत निर्णय घ्या...'

NCP ZP Member Issue : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या तीन सदस्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईची मागणी केली असून 90 दिवसांत चौकशी पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत व्हीप डावलून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या तीन सदस्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या तीन सदस्यांची ९० दिवसांत चौकशी पूर्ण करून निर्णय घेणे बंधनकारक आहे, त्यामुळे फुटीर सदस्यांची मुदतीमध्ये सुनावणी व्हावी, अशी मागणी वकिलाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि सोमेश कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप डावलून जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ॲड दत्तात्रय घोडके यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत केली आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आता सुनावणीची पुढची तारीख २९ एप्रिल ही ठेवली आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर सदस्य आपले म्हणणे मांडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनुसार व्हीप झुगारणाऱ्या सदस्यांवर निर्णय होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी २० मार्च रोजी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि सोमेश कांबळे यांनी भाजपला मतदान केले होते. त्याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे गटनेते उदय कबुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखली केली होती. त्याची दुसरी सुनावणी झाली.

मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे तीन, शिवसेनेचे दोन सदस्य फुटले होते. तसेच, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेमधून उचलून नेण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्याने भाजपला बहुमत गाठता आले होते.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वकिल दत्तात्रय घोडके म्हणाले, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, या मुद्यावर सुनावणी झाली. अपात्रतेच्या मुद्यावर ९० दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक आहे, त्या मुदतीत सुनावणी पूर्ण करून निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT