Dhananjay Munde, Devendra Fadnavis
Dhananjay Munde, Devendra Fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कुणाच्याही नादाला लागा, पण पवारसाहेबांच्या नादाला लागू नका ; मुंडेंचा फडणवीसांना टोला

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपवर (bjp) हल्लाबोल केला.

सोलापुरातील गोकुळ शुगर्सच्या सांगता सभेत मुंडे बोलत होते. "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (sharad pawar) मराठवाड्यातील म्हण प्रत्यक्षात आणून दाखवली " असं म्हणतं धनंजय मुंडेंनी फडणवीसांना टोला लगावला.

धनंजय मुंडे म्हणाले, "२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लढवली. निकालामध्ये भाजपा-सेनेला बहुमत मिळालं. राष्ट्रवादीला 54 जागा, काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. कुणाच्या स्वप्नात, ध्यानीमनीही नसतानाही 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं झालं,"

"पवार साहेबांच्या नादाला न लागण्याच्या सल्ला फडणवीसांना दिला होता, पण त्यांनी ऐकलं नाही," 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं,'ही म्हण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्यक्षात आणून दाखवली " असे टोला मुंडेंनी फडणवीसांना लगावला.

प्रत्येक टनाला 20 रुपये देणार

गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण मंडळाला निधीची तरतूद करण्यासाठी ऊस गाळपाच्या प्रत्येक टनाला कारखाना 10 रुपये आणि सरकारकडून 10 रुपये असे एकुण 20 रुपये प्रमाणे निधी महामंडळाकडे जमा होणार आहे. हा निधी ऊसतोड कामगारांच्या मुलांच शिक्षण,विमा,घर,आरोग्य आणि उपचारासाठी उपयोगात आणला जाणारा आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT