dhananjay munde statement on mp bajarang sonavane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी खासदार सोनवणेंना जोडला हात; बीडची निवडणूक विजयासाठी नव्हे पाडायचं म्हणून....

Dhananjay Munde Statement on Beed mp Bajarang Sonavane: बीडची निवडणूक कोणाला विजयी करायचं म्हणून नाही तर पाडायचं म्हणून ही निवडणूक झाली. जिंकण्यासाठी निवडणूक झाली असती तर पंकजाताई विजयी झाल्या असत्या...

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना झाला आहे, तरीही त्याचे कवित्व अद्याप संपलेले दिसत नाही. 'बीडची निवडणूक कोणाला निवडून आणण्यासाठी झाली नाही तर पाडण्यासाठी झाली,'असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची एक क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे. त्यावर मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सोनवणे यांना हात जोडले. सोनवणे यांच्या व्हायरल क्लिपबद्दल बोलतांना मुंडे यांनी सोनवणे यांच्यावर निशाणा साधला.

"लोकसभा निवडणूकीत हात जोडत मी हेच सांगत होतो, आम्ही जनतेला मायबाप समजतो. जनताच आमची मालक आहे. परंतु इकडे दोनच महिन्यात निवडून आलेला माणूस मालक समजायला लागला," असा टोला मुंडे यांनी लगावला.

आम्हाला कधी जात,पात, धर्म शिवला नाही. पण बीडची निवडणूक जात, पात, धर्म बघून झाल्याने पराभव पत्करावा लागला. कोणाला विजयी करायचं म्हणून नाही तर पाडायचं म्हणून ही निवडणूक झाली. जिंकण्यासाठी निवडणूक झाली असती तर पंकजाताई विजयी झाल्या असत्या, असे म्हणत हा पराभव माझ्या जिव्हारी लागल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हणाले.

बीड लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. निवडणुकीत झालेला पराजय मोकळ्या मनाने आम्ही स्वीकारला. विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे. मी आणि पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

विशाळगड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीमेच्या नावाखाली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटनेवर काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे एका मुस्लिम तरुणाने कॉल करून सोनवणे यांना याबद्दल विचारणा केली होती. बजरंग सोनवणे यांनी मात्र प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न विचारला होता. याची कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT