Jayant Patil and Raju shetti  
पश्चिम महाराष्ट्र

नाराज राजू शेट्टींच्या मनधरणीसाठी जयंत पाटलांनीच उचललं पाऊल

माजी खासदार राजू शेट्टी (Mahavikas Aghadi) यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : शेतकऱ्यांवर अन्याय करणारी धोरणे राबवत असल्यानेच स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडली आहे. यापुढे कोणाच्या वळचणीला जाणार नाही, असेही माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी स्पष्ट केले आहे. आता नाराज असलेल्या शेट्टींची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे.

राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसोबतच राहावे, अशी इच्छा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतून राजू शेट्टींनी बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. शेट्टींनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावे. शेट्टी यांना बाहेर पडण्यामागे कोणते आहे, ते माहिती नाही. एखादी गोष्ट मला किंवा कोणत्याही मंत्र्यांना सांगितली तरी त्यांच्या कामांना नकार दिला असं झालेलं आठवत नाही. त्यामुळे त्यांनी आघाडीतून बाहेर पडू नये.

हातकंणगले तालुक्यातील चोकाक येथे 5 एप्रिलne स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टींनी केली होती. त्याचवेळी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, एक नाही तर अनेक धोरणं महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतली आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने मदत द्यायला पाहिजे होती. पण, दोन्ही सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं.

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; म्हणून पदयात्रा काढली. त्या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला बोलवलं होतं. पण, त्याठिकाणी त्यांनी सांगितलं एक आणि केलं दुसरंच. निवडणूक लढवता यावी; म्हणून आपण चळवळ उभी केली नाही. चळवळ टिकावी; म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT