सोलापूर : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी खासदार संजय राऊत (Sanjay Raut)सध्या कारागृहात आहेत. आज राऊतांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. (sharad pawar news update)
राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी भाष्य केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे संजय राऊत यांच्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, "अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगयेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे,"
शिंदे आणि ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्यावरून सध्या वाद सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाला मेळावासाठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहे,"
राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून सोमवारी (ता. 19) त्यांच्या जामीन अर्जावर तसेच कोठडीबाबतही एकत्रित सुनावणी होणार आहे.पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संजय राऊत यांच्यावर राजकीय सूडबुद्धी किंवा द्वेषातून कारवाई करण्यात आली नाही असे स्पष्टीकरण ‘ईडी’ने कोर्टासमोर दिले.सध्या राऊत हे ऑर्थर रोड कारागृहात आहेत. राऊतांची पुढच्या रिमांड व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होईल. त्यामुळे संजय राऊत यांना दीड महिन्यानंतर आता जामीन मिळतो का? हे आज समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.