Satara NCP Meeting  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP : भाजपच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या मकरंदआबांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली; ZPतील फोडाफोडाची वचपा निघणार

Sangli-satara Vidhan Parishad Election 2026 : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून तिच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 14 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जोरदार घडामोडी घडताना दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्षाने बोलावलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज (ता. १४ जून) कराडमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची बैठक होत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सांगली साताऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने शनिवारी (ता. १३ जून) कराडमध्ये महायुतीची समन्वय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँंग्रेसचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते. राष्ट्रवादी-शिवसेना मंत्र्यांच्या गैहजेरीची चर्चा रंगली आहे.

महायुतीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या राष्ट्रवादीने दुसऱ्याच दिवशी आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. खासदार नितीन पाटील हेही या वेळी उपस्थित आहेत, त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषद निवडणुकीबाबतची स्ट्रॅटेजी ठरण्याची शक्यता आहे.

मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील हे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांची मते जाणून घेणार आहेत. कारण जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने केलेल्या फोडाफोडीची मोठी झळ राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराज आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रवादीच्या सदस्यांची फोडाफोडी करण्यात आली होती. दोन सदस्यांना जिल्हा परिषदेच्या आवारातून पोलिसांनी अटक केली होती. त्याचवेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT