Rohit Pawar On ED  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar: ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रोहित पवारांचे विठुरायाला साकडे...

Mangesh Mahale

Pandharpur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना ईडी (ED) कार्यालयाने नोटीस बजावली आहे. येत्या बुधवारी ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी पवार यांनी आज (सोमवारी) पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

"जे लोकशाहीचा आवाज दाबत आहेत. त्यांच्या विरोधात लढण्याचे बळ आणि ताकद द्यावी," असे साकडे विठुरायाला घातल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. "राजकीय द्वेषापोटी राज्य आणि केंद्र सरकारकडून कारवाई केली जात आहे. पण आम्ही त्यांच्या कारवाईला घाबरणार नाही. ईडीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. पण सत्ताधारी लोक कारवाईची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत,"

रामराज्य कुठे आहे?

आज देशभर रामलल्ला प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जात आहे. परंतु रामाला अभिप्रेत असलेलं राम राज्य देशात आणि राज्यात कुठे दिसतंय का? असा सवाल ही रोहित पवार यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT