Rajendra Phalke
Rajendra Phalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी झाले सज्ज

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आगामी वर्षभरात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या, ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.

या यात्रे निमित्त जयंत पाटील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन तेथील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ही यात्रा म्हणजे आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटन बांधणी मजबूत करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनामाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याशी संवाद साधला. राजेंद्र फाळके यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळातच राष्ट्रवादीला जिल्ह्यात सर्वाधिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षपद व शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे.

राजेंद्र फाळके म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे. 14 तालुके व अहमदनगर शहर मिळून जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे सात आमदार आहेत. राज्यातील सत्तेच्या वाट्यात राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या जिल्ह्यांत अहमदनगर जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे. जिल्हा परिषद व जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीकडे आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा निश्चित फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे संघटन नेहमीच संघटित असते. राष्ट्रवादीचे महिला, युवती, युवक, ओबीसी, विद्यार्थी आदी 16 सेलही सक्रिय असतात. 14 तालुके व अहमदनगर शहरातील सर्व सेलमध्ये कार्यकर्तांची मोठी फौज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. उद्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगर दौऱ्यावर आहेत. या निमित्त कार्यकर्त्यांत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादी परिवार संवाद बैठकीतून होईल, असा विश्वासही फाळके यांनी व्यक्त केला.

त्यांनी सांगितले की, या यात्रेत प्रत्येक तालुक्याचा आढावा यात घेतला जाणार आहे. या निमित्त दोन दिवस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व अहमदनगर शहरात बैठक होईल. प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीच्या पक्ष बांधणी कामाचा प्रदेशाध्यक्ष आढावा घेणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील सर्व सेलमधील कार्यकारिणी सक्रिय आहेत अथवा नाही हे प्रदेशाध्यक्ष समक्ष पाहून आढावा घेतील. यावेळी सर्व सेलचे प्रांतांचे अध्यक्ष उपस्थित असतील. जिल्हा राष्ट्रवादीमय आहेच पण त्याला आणखी बळकट करण्याचे काम राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून होईल, अशी मला खात्री आहे, असे फाळके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT