MLA Anil Babar News, Jayant Patile Latest News
MLA Anil Babar News, Jayant Patile Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील बंडखोर आमदार अनिल बाबरांचा करेक्ट कार्यक्रम करणार?

सरकारनामा ब्युरो

विटा : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना सूचक इशारा दिला आहे. मंत्री-संत्री कोणी पण होऊ देत सगळ्यांचा सातबारा आपल्याकडे आहे, असं सांगत पाटील यांनी आपण करेक्ट कार्यक्रम करू, असं म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूरचा आमदार राष्ट्रवादीचा (NCP) करण्याबाबत सूचक वक्तव्य केली आहेत. (Jayant Patil Latest News)

जयंत पाटील यांनी सोमवारी सकाळी विटा शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि विटा पालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेली माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

येत्या निवडणुकीत 26 पैकी 26 जागा निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. तुम्ही कुणीही घाबरू नका. राष्ट्रवादी पक्ष आणि मी तुमच्या पाठिशी आहे. आपण करेक्ट कार्यक्रम करू. मी आज फारकाही बोलणार नाही. पण लवकर विटेकर आणि खानापूरच्या जनतेसमोर बोलणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पाटील आणि बाबर आमनेसामने येण्याचे संकेत आहेत.

वैभव पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी शंख फुंकले. ते म्हणाले, तुम्ही आदेश दिला तर नगरपालिकाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीत आम्ही खानापूरच्या जनतेच्या आशिर्वादाने राष्ट्रवादीचा आमदार देऊ. आता तर काहीच अडचण नाही, असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं.

गद्दारी करून कोणी मंत्री झाले तरी होऊ द्यात. आम्हाला या गोष्टी नवीन नाहीत. आम्ही त्याला घाबरणार नाही. निवडणुकीला ठामपणे सामोरे जाऊन नगरपालिकेत सर्व जागा निवडून आणण्याची तयारी केली आहे. मागील निवढणुकीत 24 पैकी 22 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT