Suraj Chavan NCP
Suraj Chavan NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवकने दिली भाजप विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार

सरकारनामा ब्युरो

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या विषयी महाराष्ट्रातील भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. हे प्रकरण थंड होत नाही तोच शरद पवार यांना ट्विटरवरून धमकी देण्यात आली. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ( NCP youth lodges complaint against BJP in cyber cell )

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीच्या ट्विटची सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सूरज चव्हाण यांचे काल ( ता. 13 ) सायबर सेलला पत्र देऊन ही मागणी केली. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याची विनंती पत्रातून करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र ट्विटर हँडलवर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी युवकची मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवून प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा चव्हाण यांचा आरोप आहे. शरद पवार यांच्या त्या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले होते. तरीही भाजपने ट्विटरवरून ही पोस्ट काढलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत वर्पे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपने जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT