Someshwar Sugar Factory Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Someshwar Sugar Factory Result : ‘सोमेश्वर’चा पहिलाच निकाल सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने; संग्राम सोरटे दणदणीत मतांनी विजयी

NCP First Victory In Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे ब वर्ग गटातून विजयी झाले आहेत. हा पहिला निकाल असून त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

सरकारनामा ब्यूरो

Baramati, 12 October : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक मतमोजणीत पहिलाच निकाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आला आहे. कारखान्याच्या ब वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. फक्त त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

दरम्यान, ब गटातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. आता अ गटातील म्हणजे सोसायटी गटातील मतमोजणी सुरू होणार आहे. त्या गटात सर्वाधिक चुरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता.११ ऑक्टोबर) चुरशीने ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच तीन पॅनेल एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने निकालाची प्रचंड उत्सुकता पुणे जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्राला आहे. तीनही पॅनेलच्या ८३ उमेदवारांनी या निवडणुकीत आपले नशीब अजमावले आहे. त्याची मतमोजणी सुरू आहे.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या मतमोजणीत पहिलाच निकाल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला आहे. ब वर्ग प्रतिनिधी गटामधून राष्ट्रवादीचे संग्राम सोरटे हे विजयी झालेले आहेत. त्यांच्या विजयाची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या निमित्ताने सुनेत्रा पवार यांनी या निकालात पहिलं खातं उघडलेलं आहे.

संग्राम सोरटे यांना निवडणुकीत 131 मतांपैकी तब्बल 92 मते मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांनी हा विजय मिळविला आहे. हा पहिला विजय सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात गेला आहे. आता उर्वरीत गटातील कलाची उत्सुकता आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तर माजी आमदार संजय जगताप आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल असे तीन पॅनेल रिंगणात उतरले होते. तीनही पॅनेलच्या ८३ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले होते. त्यात सोरटे यांनी पहिल्याच झटक्यात बाजी मारली आहे.

राज्यात सर्वाधिक उसदर देणारा कारखाना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात परिचित आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कारखान्याची पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT