Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बसवेश्वर स्मारक समितीतून भगिरथ भालकेंना डावलले; राष्ट्रवादीत नाराजी!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : तत्कालीन भाजप (bjp) सरकारने मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा बसवेश्वर स्मारक समिती स्थापन केली होती. महाविकास आघाडी सरकारने ती समिती आज बरखास्त केली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली ३४ सदस्यांच्या नव्या समितीची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. (New 34 member committee for Mahatma Basaveshwar memorial at Mangalvedha)

पंढरपूर-मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने (स्व.) भारत भालके हे पूर्वीच्या समितीमध्ये होते. नव्या समितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना समितीत संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त होत आहे.

महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचा सरकारी निर्णय उपसचिव मनोज जाधव यांच्या सहीने आज प्रसिद्ध झाला आहे. मंगळवेढ्यातील बहुचर्चित महात्मा बसवेश्वर स्मारक तत्काळ पूर्ण करावे, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत आहे. भाजप सरकारच्या काळात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. तत्कालीन समितीने स्मारकाचा आराखडाही सरकारला सादर केला होता. परंतु निधीची तरतूद होऊनही अजूनही झालेली नाही.

स्मारकाबाबत नव्याने समितीची रचना करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, निवासी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वसतूसंग्रहालय व कला संचालनालय अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी, नगर रचनाकार, आमदार अमोल मिटकरी, आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी पाटील, आमदार हरीश पिंपळे, माजी मंत्री दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, बसवराज पाटील, मनोहर पटवारी, काकासाहेब कोयटे, गुरुनाथ बडूरे, अमरनाथ कस्तुरे, उदय चौडे, गंगाधर पटणे, डॉ. बसवराज बगले यांच्याबरोबर मंगळवेढ्यातील ॲड. शैलेश हावनाळे, विजय बुरकुल, ऍड. शिवानंद पाटील, संजीव कवचाळे, तुकाराम कुदळे, ऍड. नंदकुमार पवार, रमेश भांजे यांच्या बरोबरीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हा नियोजन मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे.

नवीन समिती स्थापन करण्यात आल्याने आता निधीची प्रतीक्षा असणार आहे. दरम्यान, या समितीवर सदस्यांची निवड करताना महाविकास आघाडी सरकारने आपल्या सोयीच्या कार्यर्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्या भालके यांचे नाव नसल्याने राष्ट्रवादीकडून याबाबत विचारणा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT