सांगोला (जि. सोलापूर) : ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) पुन्हा एकदा नव्या ऑडिओ क्लिपमुळे (Audio Clip) प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. तांदळवाडी रस्त्यासाठी निधी दिल्याचे सांगून ‘गावात धिंगाणा करा... बापू काय येडा आहे का...? बापूएवढा हुशार माणूस महाराष्ट्रात शोधून सापडायचा न्हाय’ असं डायलॉग मारत जावा, अशी डायलॉगबाजी त्यांनी महिमचे सरपंच राजकुमार मरगर यांच्याशी बोलताना केली. (New audio clip of MLA Shahajibapu Patil again viral)
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची महिमचे सरपंच राजकुमार मरगर यांच्याची फोनवरून झालेली बातचित जसी आहे तशी....
शहाजी पाटील : काय चाललंय राजू. (सरपंच : काही नाही बापू)... सरपंचाचा विजय असो...बरं एक चांगलं काम केलंय...तांदळवाडी रोड डांबरीकरणासाठी आणखी दीड कोटी रुपये टाकून बसवलाय....पहिले ४७ लाख आणि हे दीड कोटी असे दोन कोटी रुपये त्या रस्त्याला झालं. (सरपंच. भरपूर झालं. निधी दिल्याबद्दल सरपंचांनी आमदाराचे अभिनंदनही केले). सांगोला तालुक्याच्या हद्दीपर्यंत रोड टकाटक. तो रोड रुंद होणार आहे. दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या भरून दोन गाड्या बसतील असा तो रोड होणार आहे.
सरपंच : भारी झालं. बापू तुम्ही भरपूर कामं दिलीत.
शहाजी पाटील : उद्या गावात धिंगाणा करा... (सरपंच : हो हो करतो की) जरा बोलत जावा रं...ह्या लग्नात आला आणि त्या लग्नात आला... तो बाबासाहेब (गणपतराव देशमुखांचे नातू) मोकळा हिंडत बसलाय... कवा मुंबई माहित नाय...कवा पुणं माहिती नाही.... कामं कोण आणणार ? आणि कोण करणार... ? बापू धडा धड काम करायला लागलाय.
सरपंच : सत्तेच्या विरोधात राहात्याती. सत्तेच्या विरोधात राहून त्यांचा काय उपयोग आहे का
शहाजी पाटील : बापू काय येडा आहे काय म्हणायचं... ? चाळीस वर्षाचं मुरलेले पान आहे म्हणायचं. (सरपंच : आम्ही तर तुम्ही आणलेला निधी सगळ्या तालुक्यात सांगतोय.) शिंदे साहेबांपाशी राहून धडाधड तालुक्याला पैसे मिळावयला लागलंय. बुद्धीमान हाय...हुशार हाय म्हणायचं...त्याच्याएवढा हुशार माणूस महाराष्ट्रात मिळायचा नाही. एक दणक्यात एक फोनवर कुठल्या कुठल्या जगात पसरला लगा. आपणचं आपल्या माणसाची किमत करत नाही, असं जरा डायलॉग मारत जावा.
सरपंच : नाही नाही सांगतो...
शहाजी पाटील : तो शेकाप पक्ष बडबडून पुढं जातो आणि आपण काम करून तसंच राहतो. (सरपंच : आपूण तसंच राहिलोय) सगळ्यांनी बडबडायला पाहिजे.
सरपंच : दिघंचीत सकाळच्या लग्नात मी बघितलं. आपली माणसं लगीच गोळा होत नाहीत.
शहाजी पाटील : आपली गोळा होत नाहीती. त्यांची लगेच गोळा होत्याती. सवय लावायला पाहिजे ना. चालतंय.... सरपंचाचा विजय असो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.