Eknath Shinde | Shivsena | Gopikishan Bajoria  Shivsena
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena : अकोल्यात ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray : दोन जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुखांसह कार्यकारिणी जाहीर

सरकारनामा ब्युरो

अकोला : अकोल्यातील बाजोरिया गटाने चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) हात सोडून शिंदेंच्या गटात (Eknath Shinde) प्रवेश केला होता. दरम्यान, या प्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाने शिवसेनेची स्वतःची नवीन अकोला जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमध्ये दोन जिल्हाप्रमुख निवडण्यात आले असून अश्विन नवले आणि विठ्ठल सरप हे जिल्हाप्रमुख असणार आहेत तर योगेश अग्रवाल यांच्याकडे अकोला महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अकोल्याचे विधान परिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून बाजोरिया यांच्याकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) अकोला जिल्हा संपर्क प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार बाजोरिया यांनी आज जिल्हा कार्यकारणी घोषित केली आहे.

बाजोरिया यांनी दोन जिल्हाप्रमुखांसह नगरसेवक शशिकांत चोपडे यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख तर योगेश बुंदीले यांच्याकडे निवासी उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली आहे. तर उर्वरित नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वारंवार डावलले...

दहा वर्षे नगरसेवक, १८ वर्षे आमदारकी, ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. त्यानंतरही वारंवार डावलण्यात आले. कधीही पदाचा आग्रह धरला नाही. अपेक्षा होती व ती बोलूनही दाखविली. मात्र, वारंवार डावलण्यात आले. मतांचे पाठबळ नसताना तीन वेळा निवडून आलो आणि ८५ टक्के मतदान असताना पराभूत झालो. याची कारणमीमांसा करण्यासाठी मातोश्रीवर गेलो, पण भेट नाकारली, याचे दुःख मनात होते, त्यामुळे वेगळा विचार केला असे माजी आमदार बाजोरियांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT